Cricket Tournament : गोव्याचा कर्नल सी. के. नायडू क्रिकेट स्पर्धेत पराभव निश्चित

कर्नल सी. के. नायडू क्रिकेट : उत्तर प्रदेशचे विजयासह बोनस गुणासाठी प्रयत्न
ऋत्विक नाईक
ऋत्विक नाईकKishor Petkar

पणजी : गोव्याची फलंदाजी दुसऱ्या डावातही कमजोर ठरली, त्यामुळे त्यांचे नुकसान झालेच, तसेच पराभवही निश्चित झाला. कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशला बोनस गुणासह विजय नोंदविण्याची चांगली संधी प्राप्त झाली. (Goa cricket tram Colonel CK Naidu loses cricket tournament)

अळूर-बंगळूर (Bangalore) येथे सुरू असलेल्या एलिट फ गटातील सामन्यात गोव्याचा दुसरा डाव गुरुवारी 192 धावांत आटोपला. त्यापूर्वी उत्तर प्रदेशने कालच्या 7 बाद 260 वरून पहिल्या डावात 300 धावा करून गोव्यावर 121 धावांची आघाडी प्राप्त केली. त्यामुळे त्यांना दुसऱ्या डावात विजयासाठी 72 धावांचे आव्हान मिळाले, त्यापैकी 31 धावा त्यांच्या सलामीवीरांनी सात षटकांत नोंदविल्या. सामन्याच्या शेवटच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी त्यांना आणखी 41 धावांची गरज आहे. लक्ष्य 10 विकेट राखून गाठल्यास उत्तर प्रदेशला बोनसह सात गुण मिळतील.

ऋत्विक नाईक
IPL 2022: मुंबईचा 'सूर्या' पुन्हा संघात सामील, RR ला देणार टक्कर!

गोव्याचे फलंदाजीत अपयश

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रभावी गोलंदाजीसमोर पूर्ण क्षमतेने खेळण्याचे गोव्याचे फलंदाज दुसऱ्या डावातही विसरले. पहिल्या डावात त्यांनी 179 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात 192 धावा. ईशान गडेकर व मंथन खुटकर यांनी पुन्हा निराशा केली. सलामीच्या वैभव गोवेकरचे अर्धशतक दोन धावांनी हुकले. त्यांने तिसऱ्या विकेटसाठी विश्वंबर काहलोनसमवेत तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली.

काहलोनने 88 चेंडू किल्ला लढविला, पण त्याला 16 धावाच करता आल्या. कर्णधार दीपराजने 93 चेंडूंत 34 धावा केल्या, त्यालाही मोठी धावसंख्या रचता आली नाही. वैभवने 76 चेंडूंत सहा चौकार व दोन षटकार मारले. वैभवनंतर डावात दुसऱ्या क्रमांकाच्या धावा आठव्या क्रमांकावरील ऋत्विक नाईकने केल्या. त्यांच्या 48 चेंडूंतील 41 धावांमुळे गोव्याला दुसऱ्या डावात 71 धावांची आघाडी मिळाली. ऋत्विकने चार चौकार व एक षटकार मारताना नवव्या विकेटसाठी धीरज यादवसह 39 धावांची भागीदारी केली.

ऋत्विक नाईक
IPL 2022: कोलकाता नाइट रायडर्स देणार पंजाब किंग्जला टक्कर

ऋत्विकचे सहा बळी

उत्तर प्रदेशने कालच्या धावसंख्येत शुक्रवारी सकाळी आणखी चाळीस धावांची भर टाकली. त्यांचा कर्णधार समीर चौधरी याला सलग दुसरे शतक चार धावांनी हुकले. ऋत्विकने त्याला यष्टिरक्षक सोहम पानवलकर याच्याकरवी झेलबाद केले. त्याने 236 चेंडूंतील संयमी खेळीत 96 धावा करताना 11 चौकार मारले. गोव्याचे (Goa) इतर गोलंदाज विकेटसाठी संघर्ष करत असताना वेगवान ऋत्विक नाईकने भन्नाट मारा केला. त्याने 56 धावांत 6 गडी बाद केले.

ऋत्विक नाईक
क्राईम ब्रँचची मडगाव आणि वेर्णा येथे कारवाई; आठ लाखांचा गांजा जप्त

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : 179 व दुसरा डाव : 66.3 षटकांत सर्वबाद 192 (वैभव गोवेकर 48, ईशान गडेकर 1, मंथन खुटकर 1, विश्वंबर काहलोन 16, दीपराज गावकर 34, तुनीष सावकार ०, सोहम पानवलकर 8, मोहित रेडकर 13, ऋत्विक नाईक 41, धीरज यादव नाबाद 9, हेरंब परब 11, कुणाल त्यागी 1-24, करण चौधरी 1-12, कुणाल यादव 2-33, कृतग्य सिंग 4-73, प्रिन्स यादव 2-16).

उत्तर प्रदेश, पहिला डाव : 96 षटकांत सर्वबाद 300 (समीर चौधरी 96, कृतग्य सिंग 27, हेरंब परब 22-3-88-1, ऋत्विक नाईक 27-7-56-6, दीपराज गावकर 15-3-36-1, धीरज यादव 16-1-52-0, मोहित रेडकर 6-0-39-0 , तुनीष सावकार 8-4-11-1, विश्वंबर काहलोन 2-0-12-0) व दुसरा डाव : 7 षटकांत बिनबाद 31 (समीर रिझवी नाबाद 18, आंजनेय सूर्यवशी नाबाद 13, हेरंब परब 4-0-22-0, ऋत्विक नाईक 3-1-9-0).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com