
पणजी: डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर याने लिस्ट 'अ' कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना 41 धावांत 5 गडी टिपले, त्या बळावर विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याने शनिवारी अरुणाचल प्रदेशला पाच विकेट राखून हरविले.
(Goa defeated Arunachal Pradesh in the Vijay Hazare Trophy ODI Cricket Tournament)
सामना अळूर-बंगळूर येथे झाला. नाणफेक जिंकून प्रतिस्पर्ध्यांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर गोव्याने अरुणाचल प्रदेशचा डाव 175 धावांत गुंडाळला. तेची दोरिया (50) व कामशा यांगफो (63) यांनी अर्धशतके नोंदविताना चौथ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केल्यामुळे अरुणाचलला स्पर्धेत प्रथमच पावणेदोनशे धावा करता आल्या.
नंतर स्नेहल कवठणकर (68) व कर्णधार सुयश प्रभुदेसाई (62) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 111 धावांच्या भागीदारीमुळे गोव्याने सामना 25.3 षटकांतच 5 विकेट गमावून जिंकला. गोव्याचा हा पाच सामन्यांतील दुसरा विजय ठरला. त्यांचे आता 10 गुण झाले आहेत.
संक्षिप्त धावफलक
अरुणाचल प्रदेश : 50 षटकांत सर्वबाद 175 (न्गुरांग जेम्स 13, तेची दोरिया 50, कामशा यांगफो 63, मापू यिगाम 21, अर्जुन तेंडुलकर 9-0-28-1, लक्षय गर्ग 8-1-32-3, अमूल्य पांड्रेकर 9-0-41-5, मोहित रेडकर 10-0-39-0, सिद्धेश लाड 8-0-11-0, सुयश प्रभुदेसाई 2-0-10-1, वेदांत नाईक 4-0-12-1)
पराभूत वि. गोवा : 25.3 षटकांत 5 बाद 176 (ईशान गडेकर 1, स्नेहल कवठणकर 68, सुयश प्रभुदेसाई 62, दीपराज गावकर 15, मोहित रेडकर 4, एकनाथ केरकर नाबाद 9, अमूल्य पांड्रेकर नाबाद 5, याब निया 1-27, करकिर ताये 2-39, मापू यिगाम 2-35).
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.