Goa Cricket: 'दर्शन'च्या घणाघाताने 'बिहार' गारद

गोव्याचा बिहारवर 88 धावांनी दणदणीत विजय
Goa Cricket
Goa CricketDainik Gomantak

पणजी: डावखुरा फलंदाज दर्शन मिसाळ याचे घणाघाती नाबाद शतक गोव्यासाठी रविवारी ‘मॅचविनिंग’ ठरले. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याने बिहारवर 88 धावांनी दणदणीत फरकाने मात केली. दीपराज गावकर याची तुफानी फलंदाजी, तसेच एकनाथ केरकर, सिद्धेश लाड व स्नेहल कवठणकर यांचे फलंदाजीतील योगदानही निर्णायक ठरले.

(Goa defeated Bihar in the Vijay Hazare Trophy ODI Cricket Tournament)

Goa Cricket
Ironman 70.3 Goa: मुंबईचा निहाल बेग ठरला 'आर्यनमॅन'; गतविजेत्या बिस्वरजित सायखोमला टाकले मागे

स्पर्धेच्या 'क' गटातील सामना अळूर-बंगळूर येथे झाला. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याने 6 बाद 329 धावा केल्या. त्यानंतर बिहारचा डाव 46.5 षटकांत 241 धावांत गुंडाळला, तरीही 4 बाद 37 वरून बिहारच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांना सतावले, एकतर्फी विजयात ही बाब सलणारी ठरली.

सूर्य वंश (63 धावा, 74 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार) व सचिनकुमार सिंग (76, 84 चेंडू, 11 चौकार) यांनी पाचव्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी केली. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना मंगळवारी (ता. 15) केरळविरुद्ध होईल. गोव्याचे आता दोन लढतीनंतर सहा गुण झाले आहेत.

Goa Cricket
England Won T-20 World Cup: वर्ल्डकप विजेत्या इंग्लंडला बक्षीस म्हणून मिळणार इतके कोटी रूपये

दर्शन, दीपराजची तुफानी फलंदाजी

दर्शन मिसाळ व दीपराज गावकर यांनी डावाच्या अखेरच्या टप्प्यात तुफानी फलंदाजी केली. या कालावधीत गोव्याने 7 षटकांत 104 धावा कुटल्या. दर्शनने 62 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 107 धावा केल्या, तर दीपराजने अवघ्या 19 चेंडूंत 44 धावा करताना 2 चौकार व 4 षटकार खेचले. त्यांनी सहाव्या विकेटसाठी 36 चेंडूंत 86 धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी, एकनाथ केरकर व सिद्धेश लाड यांनी अर्धशतके ठोकली.

एकनाथ व सिद्धेशने तिसऱ्या विकेटसाठी 50 धावांची, तर सिद्धेश व दर्शन यांनी पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. एकनाथने 96 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचत 63 धावा केल्या, तर सिद्धेशने 65 चेंडूंत 4 चौकारांच्या साह्याने 55 धावा केल्या. वैभव गोवेकर डावाच्या सुरवातीस एकही चेंडू न खेळता धावबाद झाल्यानंतर स्नेहल कवठणकर व एकनाथ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली होती. स्नेहलने 56 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार मारताना 44 धावा केल्या.

दर्शनचे पहिलेच ‘लिस्ट ए’ शतक

दर्शनने ‘लिस्ट ए’ एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिलेच शतक झळकावले. 30 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाचा हा 51 वा सामना होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक नोंदविणारा तो गोव्याचा एकंदरीत 15 वा फलंदाज ठरला.

संक्षिप्त धावसंख्या

गोवा : 50 षटकांत 6 बाद 329 (स्नेहल कवठणकर 44, वैभव गोवेकर 0, एकनाथ केरकर 63, सिद्धेश लाड 55, सुयश प्रभुदेसाई 0, दर्शन मिसाळ नाबाद 107, दीपराज गावकर 44, लक्षय गर्ग नाबाद 1, हर्षविक्रम सिंग 2-90, आशुतोष अमन 3-42) वि. वि.

बिहार: 46.5 षटकांत सर्वबाद 241 (मंगल महरौर 12, साकिबुल गनी 16, सूर्य वंश 63, सचिनकुमार सिंग 76, वीरप्रताप सिंग नाबाद 31, अर्जुन तेंडुलकर 7-0-32-2, लक्षय गर्ग 7-0-42-2, दर्शन मिसाळ 10-1-40-2, मोहित रेडकर 10-1-48-1, फेलिक्स आलेमाव 4.5-0-38-1, दीपराज गावकर 2-0-5-0, सिद्धेश लाड 6-0-35-2).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com