क्रिकेट प्रशिक्षणाच्या माध्यमातून खेळाडूंना रोजगाराची संधी
Goa: लेव्हल-1 क्रिकेट प्रशिक्षक शिबिरात सहभागी झालेल्या गोव्यातील माजी खेळाडूंसमवेत मार्गदर्शकदैनिक गोमन्तक

क्रिकेट प्रशिक्षणाच्या माध्यमातून खेळाडूंना रोजगाराची संधी

गोवा क्रिकेट असोसिएशनतर्फे राज्यात प्रशिक्षकांना लेव्हल-1 अभ्यासक्रम

Goa: गोवा क्रिकेट असोसिएशनने (GCA) राज्यात क्रिकेट प्रशिक्षक शिक्षणावर लक्ष केंद्रीत करताना रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. त्यात त्यांनी लेव्हल-1 प्रशिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध केला.

जीसीएने कोविड -19 महामारी (Covide - 19 Epidemic) कालावधीत राज्यातील क्रिकेट प्रशिक्षकांसाठी लेव्हल-1 प्रशिक्षण शिबिर घेतले होते. गेल्या वर्षी 7 ते 12 डिसेंबर या कालावधी झालेल्या ऑनलाईन शिबिरात राज्यातील 16 प्रशिक्षकांनी भाग घेतला. मागील शुक्रवारी याविषयी प्रात्यक्षिक शिबिर पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे मार्गदर्शक अपूर्व देसाई, के. जसवंत व आर. मुरलीधर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक शिबिर झाल्याची माहिती जीसीए प्रशिक्षण आणि क्रिकेट कार्यवाही संचालक प्रकाश मयेकर यांनी दिली. ते शिबिराचे समन्वयक होते.

Goa: लेव्हल-1 क्रिकेट प्रशिक्षक शिबिरात सहभागी झालेल्या गोव्यातील माजी खेळाडूंसमवेत मार्गदर्शक
T20 World Cup: मार्गदर्शकाच्या भूमिकेचे धोनी मानधन घेणार नाही

राज्यातील माजी क्रिकेटपटू, तसेच शारीरिक शिक्षण शिक्षकांना क्रिकेट प्रशिक्षक या नात्याने व्यासपीठ मिळवून देण्यासाठी जीसीएचे नियोजन आहे. प्रशिक्षकांसाठी लेव्हल-1, लेव्हल-2 अभ्यासक्रमाबरोबरच क्रिकेट पंच, व्हिडिओ एनालिस्ट, सामनाधिकारी, फिजिओ यांच्यासाठी अभ्यासक्रम, याशिवाय शालेय स्पर्धांत भाग घेणाऱ्या शारीरिक शिक्षक शिक्षकांना लेव्हल- 0 प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्यासाठी जीसीएने नियोजन केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी दिली.

Goa: लेव्हल-1 क्रिकेट प्रशिक्षक शिबिरात सहभागी झालेल्या गोव्यातील माजी खेळाडूंसमवेत मार्गदर्शक
न्यूझीलंड विरुध्दच्या मालिकेत टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक

प्रत्येक तालुक्यात प्रशिक्षक

क्रिकेट प्रशिक्षक मार्गदर्शक उपक्रमाविषयी जीसीए सचिव विपुल फडके यांनी सांगितले, की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सहकार्याने जीसीए प्रशिक्षक शिक्षण मोहीम पुढे नेत आहे. या उपक्रमातून उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षकांना लवकरच जीसीएतर्फे प्रत्येकी तालुका क्रिकेट केंद्रावर नियुक्त केले जाईल.

Related Stories

No stories found.