Goa: महिला फुटबॉल महोत्सवात एफ सी गोवा विजेता
महिला फुटबॉल महोत्सवात विजेता ठरलेल्या एफ सी गोवा संघातील खेळांडूंसमवेत मान्यवर.Dainik Gomantak

Goa: महिला फुटबॉल महोत्सवात एफ सी गोवा विजेता

या आमंत्रितांच्या महोत्सवात चार संघांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन संघांव्यतिरिक्त कंपान्शन व व्हायएफए या संघांचा समावेश होता.

फातोर्डा: फातोर्डा येथील द गुड शेफर्ड (The Good Shepherd) संघटना व शिरवडे स्पोर्टस (Shirwade Sports) क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिला फुटबॉल (Women's football) महोत्सवातील अंतिम सामन्यात यजमान शिरवडे क्लबचा एकमेव गोलने पराभव करुन एफ सी गोवा (F C Goa) संघाने विजेतेपद पटकावले. विजयी गोल सामन्याच्या 31व्या मिनिटाला जोयवी फर्नांडिसने नोंदवला. या आमंत्रितांच्या महोत्सवात चार संघांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन संघांव्यतिरिक्त कंपान्शन व व्हायएफए या संघांचा समावेश होता. बक्षिस वितरण समारंभाला द गुड शेफर्ड संघटनेचे अध्यक्ष फ्रांसिस्को फर्नांडिस, फादर एल्विस गुदिन्हो, हे मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com