Goa: तीन लढतीतील पहिला पराभव;कौशल, आयुषची झुंज अपयशी
Cricket Dainik Gomantak

Goa: तीन लढतीतील पहिला पराभव;कौशल, आयुषची झुंज अपयशी

विनू मांकड स्पर्धेत हैदराबादची (Hyderabad)गोव्यावर (Goa)81 धावांनी मात. हैदराबादने स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून गटातील अव्वल स्थान कायम राखले.

पणजी: कर्णधार कौशल हट्टंगडी आणि अष्टपैलू आयुष वेर्लेकर(AYUSH WERLEKAR) यांनी किल्ला लढविताना तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली, पण त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. त्यामुळे विनू मांकड करंडक 19 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट(Cricket) स्पर्धेच्या एलिट क गटात गोव्याला हैदराबादकडून 81 धावांनी पराभव पत्करावा लागला.

सामना शुक्रवारी मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या (Narendra Modi Stadium ) मैदानावर झाला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 283 धावा केल्या. के. कृतिक रेड्डी (82 , 94 चेंडू, 12 चौकार) व कर्णधार तिलक वर्मा (59 , 74 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार) यांनी 125 धावांची सलामी देत हैदराबादला मजबूत पाया रचून दिला. याशिवाय मध्यफळीतील शशांक लोकेश (59 , 53 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार) याची आक्रमक फलंदाजीही हैदराबादसाठी (Hyderabad)महत्त्वपूर्ण ठरली. नंतर गोव्याचा डाव 45.3 षटकांत 202 धावांत आटोपला.

Cricket
Goa: मुलांचा संघाने 'राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट' स्पर्धेत मिळवले उपविजेतेपद

कौशल हट्टंगडी (70, 99 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार), तसेच आयुष वेर्लेकर (71 , 83 चेंडू, 8 चौकार, 3 षटकार) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. मात्र 32 व्या षटकात कौशल त्रिफळाचीत बाद झाल्यानंतर गोव्याच्या डावाची पडझड झाली व त्यांना सावरता आले नाही. कौशल व आयुष 24 धावांत माघारी परतल्यामुळे गोव्यासाठी आव्हान खूपच कठीण ठरले. त्यापूर्वी आयुषने गोलंदाजीतील उपयुक्तता सिद्ध करताना चार गडी बाद केले होते.

गोव्याचा हा तीन लढतीतील पहिला पराभव ठरला. त्यांचे आता सहा गुण कायम आहेत. हैदराबादने स्पर्धेत सलग तिसऱ्या विजयाची (Win)नोंद करून गटातील अव्वल स्थान कायम राखले. त्यांचे 12 गुण झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com