Goa Football: विजेतेपदासाठी स्पोर्टिंगला आंबेलीचे आव्हान

अंतिम लढत घोगळ-मडगाव येथील चौगुले फुटसाल अरेनावर (Goa Football)
उपांत्य फेरीत झालेल्या आंबेली स्पोर्टस क्लब व शिरवडे स्पोर्टस क्लब यांच्यातील सामन्याचा क्षण (Goa Football)
उपांत्य फेरीत झालेल्या आंबेली स्पोर्टस क्लब व शिरवडे स्पोर्टस क्लब यांच्यातील सामन्याचा क्षण (Goa Football)Dainik Gomantak

Goa Football Associationच्या पहिल्या राज्यस्तरीय फुटसाल अजिंक्यपद (Goa State level futsal championship) स्पर्धेत विजेतेपदासाठी स्पोर्टिंग क्लब द गोवा संघासमोर आंबेली स्पोर्टस क्लबचे (Ambeli Sport club) आव्हान असेल. अंतिम लढत घोगळ-मडगाव येथील चौगुले फुटसाल अरेनावर येत्या रविवारी (ता. 12) होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मंगळवारी स्पोर्टिंग क्लबने सांताक्रूझ क्लब केळशी संघावर 8-2 फरकाने, तर आंबेली क्लबने शिरवडे स्पोर्टस क्लबवर 4-1 फरकाने मात केली.

उपांत्य फेरीत झालेल्या आंबेली स्पोर्टस क्लब व शिरवडे स्पोर्टस क्लब यांच्यातील सामन्याचा क्षण (Goa Football)
FC Goaची विजयी सुरवात

पहिल्या उपांत्य लढतीत स्पोर्टिंग क्लबसाठी पहिला गोल मार्कुस मस्कारेन्हास याने, तर दुसरा गोल क्लाईव्ह मिरांडा याने केला. विश्रांतीनंतर लॉईड कार्दोझ याने संघाचा तिसरा गोल केल्यानंतर मार्कुसने लागोपाठ दोन गोल नोंदवून स्पोर्टिंगची आघाडी पाच गोलांनी भक्कम केली. नंतर क्लुसनर परेराने केळशी संघाची पिछाडी कमी केली. मार्कुसने सामन्यातील वैयक्तिक चौथा गेल्यानंतर क्लाईव्ह मिरांडाच्या स्वयंगोलमुळे केळशी क्लबने पिछाडी आणखी एका गोलने कमी केली. लॉईडने लागोपाठ दोन गोल नोंदवून हॅटट्रिक पूर्ण केली आणि स्पोर्टिंगच्या अंतिम फेरीतील जागेवर शिक्कामोर्तब केले.

शिरवडे क्लबविरुद्धच्या उपांत्य लढतीत आंबेली क्लबसाठी रोनाल्डो परेरा याने दोन, तर डॉमनिक सुवारिस याने एक गोल केला. आंबेलीच्या खाती चौथ्या गोलची भर फ्रेन्डन पिरीसच्या स्वयंगोलमुळे पडली. शिरवडे क्लबचा एकमात्र गोल रोमारियो दा कॉस्ता याने केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com