Goa Football Association Election : जीएफए अध्यक्षपदासाठी तिरंगी चुरस

एकूण 42 उमेदवार रिंगणात, दोघांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव फेटाळले
Goa Football Association Election
Goa Football Association ElectionDainik Gomantak

GFA President Election : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) निवडणुकीत अध्यक्षपदाच्या रिंगणात असलेले क्लब सां मिंगेल द ताळगावचे लेव्हिनो अँथनी परेरा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे या महत्त्वाच्या पदासाठी तिरंगी लढत अपेक्षित आहे. कार्यकारी समिती निवडणूक येत्या 30 ऑक्टोबरला होईल. एकूण 42 उमेदवार 21 जागांसाठी इच्छुक आहेत.

अध्यक्षपदासाठी आता माजी अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांचे पुत्र सावियो आलेमाव, गोवा वेल्हा स्पोर्टस क्लबचे वेल्विन मिनेझिस, फुटबॉल क्लब तुयेचे कायतान फर्नांडिस यांच्यात चुरस आहे. जीएफएचे माजी सचिव वेल्विन यांचा स्पोर्टिंग क्लब द गोवातर्फे दाखल करण्यात आलेला अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्जही स्वीकारण्यात आला आहे. जीएफए निवडणूक अधिकारी प्रमोद कामत यांनी शुक्रवारी कार्यकारी समिती निवडणुकीसाठी स्वीकारण्यात आलेले, माघार घेतलेले आणि नाकारण्यात आलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. आता 14 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येईल.

अध्यक्षपदाचे चौथे उमेदवार लेव्हिनो परेरा यांनी निवडणूक न लढविण्याचे ठरविल्यामुळे अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत.

Goa Football Association Election
Digambar Kamat : ...म्हणून दिगंबर कामतांनी घनःश्यामांचे पंख छाटले

बाबली, आर्नाल्ड यांना धक्का

जीएफए निवडणुकीत उत्तर विभाग उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केलेले हडफडे स्पोर्टिंग क्लबचे बाबली मांद्रेकर यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळला. सासष्टी विभागातून सदस्यपदाचे उमेदवार रोझमन क्रूझ स्पोर्टस क्लबचे आर्नाल्ड कॉस्ता यांचाही अर्ज नाकारण्यात आला. जीएफएकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनुसार सरकारी कर्मचारी नियमाचे उल्लंघन होत असल्याने बाबली व आर्नाल्ड निवडणूक रिंगणात बाहेर फेकले गेले. दोघेही सध्याच्या समितीचे सदस्य होते.

दक्षिण उपाध्यक्षासाठी सरळ लढत

दक्षिण विभागीय उपाध्यक्षपदाच्या एका जागेसाठी दोघांत सरळ लढत अपेक्षित आहे. या पदासाठी स्नोज फुटबॉल अकादमीचे अँथनी पांगो व स्पोर्टिंग क्लब दवर्लीचे फिलोमेनो कॉस्ता यांचे अर्ज स्वीकारण्यात आले. पांगो सध्या जीएफएचे अंतरिम अध्यक्ष आहेत.

दृष्टिक्षेपात जीएफए निवडणूक उमेदवार

अध्यक्ष (1 पद) : 3

उपाध्यक्ष उत्तर (1 पद) : 4, उपाध्यक्ष दक्षिण (1 पद) : 2

सदस्य : बार्देश (5 जागा) : 9, तिसवाडी (4 जागा) : 6, सासष्टी (7 जागा) : 15, मुरगाव (2 जागा) : 3

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com