गोवा प्रो-लीग स्पर्धा लांबणीवर

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) घेतला आहे.

पणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धा दोन आठवड्यांसाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) घेतला आहे. कोअर ऑफ सिग्नल्स संघाने स्पर्धेतून अचानक माघार घेतल्याने वेळापत्रकात बदल करावा लागत असल्याचे जीएफएने नमूद केले आहे.

नियोजनानुसार स्पर्धेस शुक्रवारपासून (ता. 15) सुरवात होणार होती. सिग्नल्स संघाने स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीने स्पर्धा 27 जानेवारीपासून खेळविण्याचे ठरविले आहे. पहिल्या दोन फेऱ्यांतील सामने लांबणीवर टाकल्यानंतर स्पर्धा आता तिसऱ्या फेरीपासून सुरू होईल. एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघ आणि साळगावकर एफसी यांच्यात 27 जानेवारीस होणाऱ्या सामन्याने यावेळच्या प्रो-लीग स्पर्धेस सुरवात होईल.

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धा यंदा कोलकास्थित सेलव्हेल ग्रुपतर्फे पुरस्कृत करण्यात आली आहे. स्पर्धा लांबणीवर टाकावी लागत असल्याबद्दल जीएफएने खेद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा: 

आयएसएल फुटबॉल लढतीत मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध बंगळूर एफसीसाठी बरोबरीचा गोल केलेला राहुल भेके -

संबंधित बातम्या