चर्चिल ब्रदर्सने मनोरा संघावर डागले चार गोल

चर्चिल ब्रदर्सची यूथ क्लब मनोरावर मात
चर्चिल ब्रदर्सने मनोरा संघावर डागले चार गोल
यूथ क्लब मनोरा संघाच्या खेळाडूस मागे टाकत चेंडूसह मुसंडी मारलेला चर्चिल ब्रदर्स संघाचा खेळाडू.Dainik Gomantak

Goa Football: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने (Churchill Brothers) यंदाच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Goa Professional League) स्पर्धेतील पहिला विजय नोंदविताना यूथ क्लब मनोरा (Youth Club Manora) संघावर चार गोल डागले. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या लढतीत विजयी संघ पूर्वार्धात दोन गोलने आघाडीवर होता.

यूथ क्लब मनोरा संघाच्या खेळाडूस मागे टाकत चेंडूसह मुसंडी मारलेला चर्चिल ब्रदर्स संघाचा खेळाडू.
भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना पुढच्या वर्षी होणार!

चर्चिल ब्रदर्सने सामन्याच्या दोन्ही अर्धात प्रत्येकी दोन गोल केले. सूरज मंडल याने दोन, तर ॲरोन बार्रेटो व क्युआन गोम्स यांनी प्रत्येकी एक गोल केला. मागील लढतीत चर्चिल ब्रदर्सला धेंपो स्पोर्टस क्लबने गोलशून्य बरोबरीत रोखले होते, त्यांचे आता दोन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. मनोरा संघाने अगोदरच्या लढतीत कळंगुट असोसिएशनला एका गोलने निसटते हरविले होते. आज पराभव पत्करल्यामुळे दोन लढतीनंतर त्यांचे तीन गुण काम राहिले.

सामन्याच्या सुरवातीस काही संधी गमावल्यानंतर चर्चिल ब्रदर्सने 19व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. अफदाल व्हारिक्कोमडम याच्या शानदार पासवर ॲरोनने पुढे आलेला मनोरा संघाचा गोलरक्षक ब्रॉडमन दोर्गार्कार याला चकवा दिला. नंतर मनोरा संघाच्या स्वीडन बार्बोझा याने चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक नोरा फर्नांडिस याची परीक्षा पाहिली, पण त्याला यश मिळाले नाही. विश्रांतीपूर्वी सौरवने क्युआनच्या क्रॉस पासवर चर्चिल ब्रदर्सची आघाडी दोन गोलने भक्कम केली.

विश्रांतीनंतरच्या खेळातही चर्चिल ब्रदर्सने धारदार खेळ कायम राखला. सेटपिसेसवर त्यांच्या खाती तिसऱ्या गोलची भर पडली. क्युआनच्या कॉर्नर किकवर सौरवने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. नंतर 72व्या मिनिटास थेट फ्रीकिक फटक्यावर क्युआनने चर्चिल ब्रदर्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

यूथ क्लब मनोरा संघाच्या खेळाडूस मागे टाकत चेंडूसह मुसंडी मारलेला चर्चिल ब्रदर्स संघाचा खेळाडू.
'आम्ही टीम इंडियाला नक्की पराभूत करु': बाबर आझम

स्पोर्टिंग, वास्को विजयी घोडदौड राखणार?

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेतील पहिल्या फेरीत स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि वास्को स्पोर्टस क्लबने विजयाची नोंद केली. शनिवारी ते धुळेर स्टेडियमवर प्रतिस्पर्धी असतील. त्यावेळी विजयी घोडदौड कोण राखतोय याची उत्सुकता असेल. स्पोर्टिंगने अगोदरच्या लढतीत पणजी फुटबॉलर्सवर 3-1 फरकाने विजय नोंदविला होता, तर वास्को क्लबने गार्डियन एंजल क्लबला 2-1 फरकाने हरविले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com