धेंपो क्लबची चर्चिल ब्रदर्सशी गोलशून्य बरोबरी

गोल करण्याच्या संधी गमावल्यामुळे सामना बरोबरीत
गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी धेंपो स्पोर्टस क्लब व चर्चिल ब्रदर्स यांच्यात झालेल्या लढतीत हेडिंग साधण्याच्या प्रयत्नात खेळाडू
गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी धेंपो स्पोर्टस क्लब व चर्चिल ब्रदर्स यांच्यात झालेल्या लढतीत हेडिंग साधण्याच्या प्रयत्नात खेळाडूDainik Gomantak

Goa Football: गोल करण्याच्या संधी गमावल्यामुळे गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लब व चर्चिल ब्रदर्स संघाला गोलशून्य बरोबरीमुळे प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. सामना सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी धेंपो स्पोर्टस क्लब व चर्चिल ब्रदर्स यांच्यात झालेल्या लढतीत हेडिंग साधण्याच्या प्रयत्नात खेळाडू
एकनाथ केरकरची गोवा संघाच्या कर्णधारपदी निवड

दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. पूर्वार्धातील खेळात चर्चिल ब्रदर्सच्या क्युआन गोम्स याने बॉक्सबाहेरून मारलेल्या सणसणीत फ्रीकिक फटक्याने धेंपो क्लबच्या खेळाडूंच्या भिंतीला व गोलरक्षकास चकविले होते, परंतु चेंडू गोलपट्टीस आपल्यामुळे चर्चिल ब्रदर्सच्या पदरी निराशा आली. त्यानंतर सूरज हडकोणकर याच्या फ्रीकिकवर एडविन व्हिएगसने हेडिंग साधले, परंतु चेंडू गोलपट्टीवर गेला, तसेच खेळाडू ऑफसाईड होता, त्यामुळे धेंपो क्लबला फायदा झाला नाही.

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी धेंपो स्पोर्टस क्लब व चर्चिल ब्रदर्स यांच्यात झालेल्या लढतीत हेडिंग साधण्याच्या प्रयत्नात खेळाडू
वेदांत महिला लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी वायएफए, शिरवडे संघाला पूर्ण गुण

सामन्याच्या ५२व्या मिनिटास धेंपो क्लबला आघाडीची सुवर्णसंधी होती, परंतु अमन गोवेकर ऐनवेळी गडबडला. त्यानंतर विनिल पुजारीचा ताकदवान फटका धेंपो क्लबचा गोलरक्षक डायलन डिसिल्वा याने योग्यपणे अडविल्यामुळे चर्चिल ब्रदर्सला गोलविना राहावे लागले. ७०व्या मिनिटास सूरज हडकोणकरच्या क्रॉसपासवर समोर केवळ गोलरक्षक असताना बदली खेळाडू व्हेलान्सो रॉड्रिग्ज याला अचूक नेम साधता आला नाही, त्यामुळे धेंपो क्लबला निराशा झेलावी लागली. सामन्यातील सहा मिनिटे बाकी असताना धेंपोच्या नेसिया फर्नांडिसला नशिबाची साथ लाभली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com