Goa Football : FC Goa संघ नव्या मोसमासाठी सज्ज

Goa Football : ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धेत कोलकाता येथे आर्मी ग्रीन संघाशी लढत
FC Goa Football team members during training session.
FC Goa Football team members during training session.Dainik Gomantak

पणजी : एफसी गोवा फुटबॉल संघाच्या (FC Goa Football Team) नव्या मोसमाची सुरवात मंगळवारपासून होत आहे. ड्युरँड कप फुटबॉल (Durand Cup Football) स्पर्धेच्या ब गटात त्यांची गाठ आर्मी ग्रीन (Army Green) संघाशी पडेल. सामना कोलकाता येथील विवेकानंद युबा भारती क्रीडांगणावर खेळला जाईल. अनुभवाचा विचार करता, उद्याच्या लढतीत एफसी गोवाचे पारडे जड राहील. आयएसएल स्पर्धेतील जमशेदपूर एफसी आणि आय-लीगमधील सुदेवा दिल्ली एफसी हे ब गटातील अन्य संघ आहेत. मोहिमेची सुरवात विजयाने करण्यावर एफसी गोवाचा भर आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला एफसी गोवाचे स्पॅनिश प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी सांगितले, की आमच्यासाठी ड्युरँड कप स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. आयएसएल मोसमपूर्व तयारी करत असताना स्पर्धात्मक सामने खेळण्यास मिळणे हा अतिरिक्त फायदाच आहे. आमचा भर युवा खेळाडूंवर असून त्यांच्यावर मेहनत घेत आहोत. टप्प्याटप्प्याने आमची प्रगती सुरू असून सध्याच्या स्थितीत एकसंध खेळणे हे आमचे मुख्य लक्ष्य आहे. ब गटात सोमवारी जमशेदपूर एफसीने पूर्ण तीन गुणांची कमाई करताना सुदेवा दिल्ली एफसीला १-० फरकाने हरविले. निर्णायक गोल 34व्या मिनिटास लालरुआतमॉला याने नोंदविला. सुदेवा दिल्ली संघ पेनल्टी फटक्याचा लाभ उठविता आला नाही.

FC Goa Football team members during training session.
Goa Football: FC GOA चे स्थानिक खेळाडूंस प्राधान्य

फेरांडोंना सुविधांबाबत चिंता

एफसी गोवाचे प्रशिक्षक फेरांडो यांनी स्पर्धेनिमित्त पुरविण्यात आलेल्या सराव सुविधांबाबत चिंता व्यक्त केली. भारतात सप्टेंबर महिन्यात सराव केंद्र तयार करणे कठीण आहे याची मला जाणीव आहे, आम्हाला युवा खेळाडूंची चाचपणी करायची असून संघ विकसित करायचा आहे. त्यामुळे कारणे देता येणार नाही. सामना दुपारी तीन वाजता सुरू होत असून उष्ण आणि दमट हवामानामुळे खेळाडूंसमोर समस्या आहे, तरीही आम्ही जुळवून घेऊ. सराव मैदानावरील सुविधा जास्त महत्त्वाच्या आहेत, त्या चांगल्या असल्यास संघाची तयारी सोपी होते. सद्यःस्थितीत हे अवघड असून आम्हाला दुखापती टाळण्यावर भर द्यावा लागेल. आमचे खेळाडू व्यावसायिक असून त्यांच्यासाठी चांगल्या सराव सुविधा गरजेच्या आहेत, असे स्पॅनिश प्रशिक्षक म्हणाले.

दृष्टिक्षेपात...

- गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत एफसी गोवा सलग 15 सामने अपराजित

- प्रशिक्षक हुआन फेरांडो यांचा सलग दुसरा मोसम

- एफसी गोवातर्फे स्पॅनिश एदू बेदिया याच्यासाठी लागोपाठ पाचवा मोसम

- बेदिया दुसऱ्या मोसमात संघाचा कर्णधार

- एफसी गोवा 2019 मध्ये सुपर कप, तर 2020 मध्ये आयएसएल शिल्ड विजेते

- आर्मी ग्रीन संघाला 2016 साली ड्युरँड कप विजेतेपद

FC Goa Football team members during training session.
भारतीय फुटबॉलपटूंना मोठी संधी- फेरांडो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com