Goa Football: FC GOA चे स्थानिक खेळाडूंस प्राधान्य

ड्युरँड कपसाठी संघात 14 गोमंतकीय, (Goa Football) कर्णधार बेदियासह चार परदेशी खेळाडू
Goa Football: FC GOA चे स्थानिक खेळाडूंस प्राधान्य
FC Goa Logo (Goa Football)Dainik Gomantak

Goa Football: ड्युरँड कप फुटबॉल (Durand Cup football) स्पर्धेसाठी एफसी गोवाने (FC Goa) 29 सदस्यीय संघ जाहीर केला असून त्यात गोमंतकीय खेळाडूंना प्राधान्य मिळाले (Goan players preferred). संघात राज्यातील 14 फुटबॉलपटू आहेत. कर्णधार एदू बेदियासह (Captain Edu Bedia) चार परदेशी खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

स्पॅनिश बेदियाचा एफसी गोवा संघातर्फे हा भारतातील सलग पाचवा मोसम आहे. हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघ स्पर्धेत खेळण्यासाठी कोलकात्यास रवाना होईल. आशियातील सर्वांत जुनी स्पर्धा असलेल्या ड्युरँड कपची यंदा 130वी आवृत्ती असून कोविड-19 महामारीमुळे (Covide- 19 Epidemic) यंदा सामने जैवसुरक्षा वातारणात खेळले जातील. स्पर्धेला पाच सप्टेंबरपासून सुरवात होईल. 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे.

FC Goa Logo (Goa Football)
ENG vs IND: रक्ताने जखमी तरीही तो मैदानावर,जेम्स अँडरसनची अनोखी खेळाडू वृत्ती

एफसी गोवा संघ: गोलरक्षक: नवीन कुमार, ह्रतीक तिवारी, धीरजसिंग मोईरांगथेम, बचावपटू: लिअँंडर डिकुन्हा, सेवियर गामा, सॅनसन परेरा, कुणाल कुंडईकर, मानूशॉन फर्नांडिस, लालमांगैसांगा (पापुईया), सेरिटन फर्नांडिस, इव्हान गोन्झालेझ, ऐबांभा डोहलिंग, महंमद अली, मध्यरक्षक: एदू बेदिया (कर्णधार), ब्रिसन फर्नांडिस, महंमद नेमिल, आल्बर्टो नोगेरा, प्रिन्सटन रिबेलो, डॅन्स्टन फर्नांडिस, ॲलेक्झांडर रोमारियो जेसूराज, रेडीम ट्लांग, नोंगडोंबा नाओरेम, ग्लेन मार्टिन्स, ब्रँडन फर्नांडिस, माकन विंकल चोटे, ख्रिस्ती डेव्हिस, आघाडीपटू: देवेंद्र मुरगावकर, होर्गे ओर्तिझ, डेल्टन कुलासो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com