तळावलीच्या विजयात कॅरेनचे पाच गोल

युनायटेड क्लब तळावलीने कॉम्पॅशन एफसीचा 8-0 फरकाने धुव्वा उडविला
तळावलीच्या विजयात कॅरेनचे पाच गोल
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू कॅरेन एस्ट्रोसियाDainik Gomantak

Goa Football: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (GFA) वेदांता महिला फुटबॉल लीग (Womens Football League) स्पर्धेत मंगळवारी युनायटेड क्लब तळावलीने कॉम्पॅशन एफसीचा 8-0 फरकाने धुव्वा उडविला, त्यात कॅरेन एस्ट्रोसिया हिने 5 गोल केले.

सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू कॅरेन एस्ट्रोसिया
T20 World Cup: मार्गदर्शकाच्या भूमिकेचे धोनी मानधन घेणार नाही

सामना नावेली येथील रोझरी मैदानावर झाला. कॅरेनच्या पाच गोलव्यतिरिक्त कर्णधार स्टेसी कार्दोझ हिने हॅटट्रिकही नोंदविली. तळावलीचा हा दोन लढतीतील पहिला विजय ठरला, तर कॉम्पॅशन क्लबला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला.

सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू कॅरेन एस्ट्रोसिया
विराटचं स्वप्न अधुरेच ! यंदाही RCB साठी IPL ट्राफी परकीच

कॅरेनने पहिला गोल दहाव्या मिनिटास केले, नंतर दोन मिनिटांनी तिने आणखी एक गोल केला. 36व्या मिनिटास स्टेसी हिने आघाडी 3-0 अशी भक्कम केली. उत्तरार्धातही तळावली क्लबने धडाका कायम राखला. कॅरेनने सलग तीन गोल केले, तर स्टेसीने दोन गोल नोंदवून संघाच्या एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केले.

Related Stories

No stories found.