Goa Football: मनोरा क्लबचा कळंगुटला धक्का

स्वीडनच्या निर्णायक गोलमुळे प्रोफेशन लीगमध्ये गुणखाते उघडले
Goa Football: मनोरा क्लबचा कळंगुटला धक्का
Goa Football: गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल; यूथ क्लब मनोरा व कळंगुट असोसिएशन सामन्याचा क्षण.दैनिक गोमन्तक

Goa Football: सामन्याच्या पूर्वार्धात स्वीडन बार्बोझा याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर यूथ क्लब मनोरा संघाने (Youth Club Manora Won) यावेळच्या गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत (Goa Professional League) पूर्ण तीन गुणांसह खाते उघडले. त्यांनी गतमोसमात तिसरा क्रमांक मिळविलेल्या कळंगुट असोसिएशनला (Calangute Association Lost) 1 - 0 फरकाने पराभूत केले.

Goa Football: गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल; यूथ क्लब मनोरा व कळंगुट असोसिएशन सामन्याचा क्षण.
T20 World Cup: आता मल्टिप्लेक्समध्ये पाहता येणार सामने, ICC चा PVR सोबत करार

सामना रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. स्वीडन याने सामन्याच्या १३व्या मिनिटास केलेला गोल निर्णायक ठरला. मनोरा क्लबच्या आघाडीफळीत स्वीडनसह निक्लास नोरोन्हा, एल्डन कुलासो यांनी धारदार खेळ केला, त्यामुळे कळंगुट असोसिएशन संघ दबावाखाली राहिला. निक्लासने मैदानाच्या उजव्या बाजूने खोलवर मुसंडी मारल्याने ताकदवान फटका मारला. कळंगुटचा गोलरक्षक परमवीर सिंग याने फटका रोखला, पण चेंडू ताब्यात राखू शकला नाही. त्याचा लाभ उठवत स्वीडनने गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली.

Goa Football: गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल; यूथ क्लब मनोरा व कळंगुट असोसिएशन सामन्याचा क्षण.
IPL 2022 च्या लिलावातील पहिले 'रिटेन कार्ड' CSK धोनीसाठीच वापरणार

कळंगुटने उत्तरार्धात बरोबरीसाठी प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. ६४व्या मिनिटास कॅल्विन बार्रेटोचा सणसणीत फ्रीकिक फटका मनोरा संघाच्या गोलरक्षकाने वेळीच रोखला. ६५व्या मिनिटास कळंगुटचा गोलरक्षक परमवीर याने स्वीडनचा प्रयत्न रोखल्यामुळे मनोरा क्लबची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. सामन्याच्या भरपाई वेळेत कॅल्विन बार्रेटोचा फटका किंचित हुकल्यामुळे बरोबरी साधण्याची कळंगुटची शेवटची संधीही हुकली.

धेंपो क्लबला चर्चिल ब्रदर्सचे आव्हान

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत सोमवारी (ता. १८) धेंपो स्पोर्टस क्लब व चर्चिल ब्रदर्स या माजी विजेत्यांत सामना होणार आहे. लढत म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर होईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com