Goa Futsal: आंबेली, पणजी फुटबॉलर्सचे वर्चस्व

Goa Futsal अनुक्रमे सांताक्रूझ-केळशी, गोवा वेल्हा क्लबवर मात
Goa Futsal: आंबेली, पणजी फुटबॉलर्सचे वर्चस्व
Goa Futsal : Clancio Pinto of Santa Cruz club Cavelossim controls the ball.Dainik Gomantak

पणजीः गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (Goa Football Association) राज्यस्तरीय फुटसाल अजिंक्यपद (Goa Futsal Championship) स्पर्धेत आंबेली स्पोर्टस क्लबने (Ambelim Sports Club) सांताक्रूझ क्लब केळशी संघावर 6-3 असा, तर पणजी फुटबॉलर्सने (Panjim Footballers) गोवा वेल्हा स्पोर्टस क्लबवर 5-2 फरकाने मात केली. दोन्ही सामने गुरुवारी घोगळ-मडगाव येथील चौगुले फुटसाल अरेनावर झाले. आंबेली संघाने प्रारंभीच सांताक्रूझ क्लबची नाकेबंदी करताना लागोपाठ तीन गोल डागले. सातव्याच मिनिटास मायरन परेराने आघाडीचा गोल केल्यानंतर रोनाल्डो परेराच्या दोन गोलमुळे नवव्या मिनिटापर्यंत आंबेलीची स्थिती भक्कम झाली. त्यानंतर स्टीफनने चौथा गोल नोंदविला. चार गोलांच्या पिछाडीनंतर केळशीच्या संघाला सावरताना क्लुसनर परेरा व लक्ष्मण थापा यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. पूर्वार्धात आंबेली संघ 4-2 असा आघाडीवर होता. विश्रांतीनंतर डॉमनिक सुवारिसने आंबेलीच्या खाती पाचव्या गोलची भर टाकली. त्यानंतर बेर्साल व्हिएगस याने केळशीची पिछाडी आणखी एका गोलने कमी केली. स्टीफन याने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत आंबेलीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Goa Futsal : Clancio Pinto of Santa Cruz club Cavelossim controls the ball.
Goa: फुटसाल वर्चस्वासाठी आठ संघांत चुरस

गोवा वेल्हा क्लबविरुद्ध विश्रांतीला पणजी फुटबॉलर्सने एका गोल आघाडी प्राप्त केली होती. क्लिफ्टन रिबेलोने हा गोल केला. उत्तरार्धात क्लिफ्टनने आणखी एक गोल केल्यानंतर ॲलन पिशोटच्या दोन गोलमुळे पणजी फुटबॉलर्सच्या खाती 4-0 अशी भक्कम आघाडी जमा झाली. फ्रँकी काब्राल व साईराज चोडणकर यांनी गोवा वेल्हाची पिछाडी 2-4 अशी कमी केली. नंतर क्लिफ्टनने सामन्यातील वैयक्तिक तिसरा गोल करून पणजी फुटबॉलर्सचा विजय निश्चित केला.

Goa Futsal : Clancio Pinto of Santa Cruz club Cavelossim controls the ball.
Goa Sports: फुटबॉलपटू ब्रुनो यांचे क्रिकेट कौशल्य!

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com