Goa Futsal : स्पोर्टिंग क्लबने शिरवडेला नमविले
Goa Futsal : Players from Sporting Club the Goa and Sirvodem Sports Club trying to control the ballDaink Gomantak

Goa Futsal : स्पोर्टिंग क्लबने शिरवडेला नमविले

Goa Futsal : स्पर्धेतील आणखी एक लढतीत एफसी वायएफए संघाची मनोरा क्लबवर मात

पणजीः गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (Goa Football Association) राज्यस्तरीय फुटसाल अजिंक्यपद (Goa State Futsal Championship) स्पर्धेत स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने विजय मिळविले, पण त्यासाठी त्यांना शिरवडे स्पोर्टस क्लबने चांगलेच झुंजविले. स्पोर्टिंगने सामना 4-2 फरकाने जिंकला. मडगाव येथील चौगुले फुटसाल अरेनावर सुरू असलेल्या या स्पर्धेत शुक्रवारी आणखी एका लढतीत एफसी वायएफए संघाने यूथ क्लब मनोरावर 7-4 फरकाने मात केली. स्पोर्टिंग क्लब शिरवडेविरुद्ध दोन वेळा पिछाडीवर पडला, पण अखेरीस त्यांनी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. रोहन रॉड्रिग्जने सामन्याच्या सुरवातीस शिरवडे संघाला आघाडी मिळवून दिली, नंतर ब्रँडन गोम्सने स्पोर्टिंगला बरोबरी साधून दिली. मात्र दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.

Goa Futsal : Players from Sporting Club the Goa and Sirvodem Sports Club trying to control the ball
Goa Futsal: आंबेली, पणजी फुटबॉलर्सचे वर्चस्व

दोन्ही संघ विश्रांतीला 1-1 गोलबरोबरीत होते. उत्तरार्धाच्या प्रारंभी चॅडेल फर्नांडिसने शिरवडे संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर क्लाईव्हने स्पोर्टिंगला बरोबरी साधून दिली, तसेच गोलरक्षक ओझेन सिल्वाच्या दक्षतेमुळे पणजीचा संघ पुन्हा पिछाडीवर गेला नाही. मार्कुस मस्कारेन्हासच्या असिस्टवर लॉईज कार्दोझने स्पोर्टिंगला आघाडी मिळवून दिली. लॉईडनेच आणखी एक गोल करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अगोदरच्या सामन्यात, एफसी वायएफए संघाच्या विजयात आर्नोल्ड फर्नांडिसने तीन, तर पुष्कर प्रभू याने दोन गोल नोंदविले. याशिवाय ॲस्टन फर्नांडिस व फिल्बर्ट परेरा यांनी प्रत्येकी एक गोल करून विजयात वाटा उचलला. वायएफए संघाच्या निकोलस फर्नांडिस व हिल्टन फर्नांडिस यांचे स्वयंगोल, तसेच गॉडफ्रे फर्नांडिसच्या गोलमुळे मनोरा संघाला पिछाडी कमी करता आली.

Goa Futsal : Players from Sporting Club the Goa and Sirvodem Sports Club trying to control the ball
Goa Football: FC GOA चे स्थानिक खेळाडूंस प्राधान्य

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com