गोवा: सेपकटकरो कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्घेत मुलांच्या गटात गोव्याचा दुहेरी मुकुट

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 31 मार्च 2021

कनिष्ठ मुलींच्या दुहेरी गटात गोव्याला तिसरे तसेच मुलींच्या रेगू गटातही तिसरे स्थान प्राप्त झाले.

फातोर्डा : गोवा सेपकटकरो  असोसिएशन व सेपकटकरो फेडरेशन ऑफ इंडियातर्फे फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू क्रिडा संकुलात आयोजित 24व्या कनिष्ठ सेपकटकरो राष्ट्रीय स्पर्धेत मुलांच्या रेगू गटात यजमान गोव्याने विजेतेपदाचा मान मिळविला. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात गोवा संघाने दिल्लीचा 21-14, 21-13 असा पराभव केला. याच गटातील दुहेरी प्रकारातही गोवाच अजिंक्य ठरला. त्यामुळे गोव्याने दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. या गटातील अंतिम सामन्यात गोव्याने दिल्लीचाच पराभव केला. कनिष्ठ मुलींच्या दुहेरी गटात गोव्याला तिसरे तसेच मुलींच्या रेगू गटातही तिसरे स्थान प्राप्त झाले.

याच स्पर्धेसोबत 23वी उपकनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाली. मात्र या स्पर्धेत गोव्याला चारही प्रकारात पहिल्या चार संघांमध्ये स्थान मिळवता आले नाही. मुलांच्या कनिष्ठ रेगू गटात गोवा संघाने सर्वोत्तम कामगिरी करताना नागालॅंड, ओडिशा, मणिपुर या संघांचा पराभव करताना उपांत्यपूर्व फेरीत गोव्याने राजस्थान व उपांत्य फेरीत बिहारचा पराभव केला. दिल्लीने अंतिम फेरीत प्रवेश करताना उपांत्यपूर्व फेरीत केरळ व उपांत्यपूर्व फेरीत मणिपुरचा पराभव केला. (Goa Goas double crown in the boys group at the Sepakatkaro Junior National Championship)

वेळसावच्या मदतीस इंज्युरी टाईम गोल; चर्चिल ब्रदर्सला 2-2 गोलबरोबरीत रोखून एका...

गोव्याच्या या विजयी संघांत लैशराम अमरजीत मित्तेय, हिजम अरुणकुमार सिंग, अब्दुल शेख, आलोक यादव, हर्ष यादव यांचा समावेश होता. 27 मार्च पासुुन सुरु झालेल्या या स्पर्धेत एकुण 22 राज्य संघांनी भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली.

बक्षिस वितरण समारंभाला केंद्रीय आयुश मंत्री तथा संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. शिवाय सेपकटकरो फेडरेशन ऑफ इंडियाचे व गोवा सेपकटकरो असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, सेपकटरो फेडरेशनचे सीईओ योगेंद्र सिंग दहिया, विरे गौ़डा, गोवा क्रिडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, नेहरु स्टेडियमचे व्यवस्थापक महेश रिवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सविसतर निकाल पुढील प्रमाणे ः-

1 ) 23वी उपकनिष्ठ राष्ट्रीय सेपकटकरो स्पर्धा - (अ) रेगू (मुली) बिहार -विजेेते, हरयाणा - उपविजेते, तिसरे स्थान - केरळ व मणिपुर

(ब) रेगू (मुलगे) बिहार -विजेते, मणिपूर - उपविजेते, तिसरे स्थान - ओडिशा, नागालॅंड.

(क) दुहेरी (मुली)- बिहार- विजेते, आंध्र प्रदेश - उपविजेते, तिसरे स्थान - मणिपूर, उत्तर प्रदेश

(ड) दुहेरी (मुलगे) - मणिपुुर - विजेते, बिहार-उपविजेते, तिसरे स्थान - राजस्थान, उत्तर प्रदेश.

2) 24वी कनिष्ठ राष्ट्रीय सेपकटकरो स्पर्घा - (अ) रेगू (मुली) - हरयाणा - विजेते, ओडिशा (उपविजेते), तिसरे स्थान - नागालॅंड, गोवा

(ब) रेगू (मुलगे) - गोवा (विजेते), दिल्ली - उपविजेते, तिसरे स्थान - बिहार, मणिपूर

(क) दुहेरी (मुली) ओडिशा (विजेते), नागालॅंड - उपविजेते, तिसरे स्थान - गोवा, हरयाणा

(ड) दुहेरी (मुलगे) गोवा (विजेते), दिल्ली - उपविजेते, तिसरे स्थान - राजस्थान, हरयाणा.

फोटो कॅप्शन - फातोर्डा :  राष्ट्रीय सेपकटाकरो स्पर्धेत  मुलांच्या कनिष्ठ गटातील विजेते गोवा व उपविजेते दिल्ली संघांतील खेळाडूंसमवेत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई. सेपकटकरो फेडरेशनचे पदाधिकारी व इतर मान्यवर.

संबंधित बातम्या