पॅरामाऊंटचा शटलर्सवर एकतर्फी विजय

पेडणे क्लबच्या (Pedne Club) डावातील 16 षटकांचा खेळ झाल्यानंतर पाऊस सुरू झाला, त्यामुळे नंतर खेळ स्थगित करावा लागला.
पॅरामाऊंटचा शटलर्सवर एकतर्फी विजय
Cricket Dainik Gomantak

पणजी: जिमखान्याच्या बांदोडकर करंडक (Gymkhana Bandodkar Trophy) T-20 बाद फेरी क्रिकेट स्पर्धेत वास्कोच्या पॅरामाऊंट स्पोर्टस क्लबने पणजीच्या शटलर्स क्लबवर 82 धावांनी एकतर्फी विजय मिळविला. सामना शुक्रवारी कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाला.

दुपारच्या सत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे महालक्ष्मी क्लब व पेडणे स्पोर्टस क्लब यांच्यातील सामना (match) पूर्ण होऊ शकला नाही. पेडणे क्लबच्या डावातील 16 षटकांचा खेळ झाल्यानंतर पाऊस सुरू झाला, त्यामुळे नंतर खेळ स्थगित करावा लागला. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, सामना नंतरच्या तारखेस खेळविला जाईल.

Cricket
टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे पुरुष मानकरी!

सकाळच्या सत्रात, सनत प्रभुदेसाईच्या (62) अर्धशतकाच्या बळावर पॅरामाऊंट क्लबने 8 बाद 175 धावा केल्या. नंतर शटलर्स क्लबचा डाव 93 धावांत आटोपला.

संक्षिप्त धावफलक:

पॅरामाऊंट स्पोर्टस क्लब :

20 षटकांत 8 बाद 175 (सनत प्रभुदेसाई 62 , दामोदर पाटणेकर 33 , विशांत तोरसकर 26 , ओम फडते 10 , सूरज सावळ 2-24 , वैभव पाल 1-10 , सनतकामत 1-24, प्रशांत पाटील 1-5) वि. वि. शटलर्स क्लब : 18.1 षटकांत सर्वबाद 93 (राजाराम कुंडईकर 37 , प्रशांत पाटील 14 धावा, विशांत तोरसकर 4 विकेट, राजन नारुलकर 2 विकेट, अंकुश पाटील, ओम फडते व दर्शन प्रत्येकी 1 विकेट.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com