गोमंतकीय फुटबॉलचा सन्मान
Jessel Carneiro गोमंतकीय फुटबॉलचा सन्मानDainik Gomantak

गोमंतकीय फुटबॉलचा सन्मान

गोमंतकीय ब्रँडन फर्नांडिसचा अनुभव लक्षात घेता, एफसी गोवास राज्यातील खेळाडूवर विश्वास दाखविता आला असता.

केरळा ब्लास्टर्सने आगामी आयएसएल स्पर्धेसाठी गोमंतकीय फुटबॉलपटू जेसेल कार्नेरो (Jessel Carneiro) याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. राज्यातील फुटबॉलचा (Goa Football) हा सन्मानच आहे. आयएसएल स्पर्धेत गोव्याचा एकच संघ असल्यामुळे राज्यातील बरेच फुटबॉलपटू देशातील इतर राज्यांतील संघांकडून खेळतात.

Jessel Carneiro गोमंतकीय फुटबॉलचा सन्मान
T20 World Cup: विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे अतरंगी सेलिब्रेशन पाहा व्हिडिओ

ईस्ट बंगालने यावेळी गोव्यातील फुटबॉलपटूंवर जास्त विश्वास दाखविला आहे. एफसी गोवा संघाने आयएसएलसाठी संघ निवडताना 28 जणांत 11 जण गोमंतकीय निवडले, पण कर्णधारपद स्पेनच्या एदू बेदियाकडे दिले. मंदार राव देसाईनंतर गोमंतकीय कर्णधाराची प्रतीक्षा आहे. गोमंतकीय ब्रँडन फर्नांडिसचा अनुभव लक्षात घेता, एफसी गोवास (FC Goa) राज्यातील खेळाडूवर विश्वास दाखविता आला असता.

Jessel Carneiro गोमंतकीय फुटबॉलचा सन्मान
गोव्याचा जेसेल झाला केरळा ब्लास्टर्सचा कर्णधार..

केरळा ब्लास्टर्ससाठी 2020-21 आयएसएल मोसम खराब ठरला. 20 सामन्यांतून त्यांना 17 गुणांचीच कमाई करता आली, त्यापैकी फक्त तीन सामन्यांत त्यांना विजयाचे पूर्ण तीन गुण मिळाले. नऊ सामन्यांत पराभव झाल्यानंतर आठ सामने बरोबरीत राखले. आयएसएलच्या मागील चार मोसमात केरळा ब्लास्टर्सला प्ले-ऑफ फेरी गाठण्यास अपयश आले आहे. मात्र नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली 2020-21 मोसमात उपांत्य फेरी गाठण्याचे लक्ष केरळा ब्लास्टर्स संघ बाळगून आहे. सर्बियाचे इव्हान व्हुकोमानोविच केरळा ब्लास्टर्सचे प्रशिक्षक आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com