Goa: हैदराबादला चेन्नईयीनविरुद्ध हॅटट्रिकची संधी

गतमोसमात साखळी फेरीत चेन्नईयीनविरुद्ध हैदराबादने बांबोळी येथे 4-1 फरकाने, तर वास्को येथे 2-0 फरकाने विजय नोंदविला.
Goa: हैदराबादला चेन्नईयीनविरुद्ध हॅटट्रिकची संधी
सराव करताना हैदराबाद एफसी संघातील खेळाडूDainik Gomantak

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या गतमोसमात हैदराबाद एफसीने माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीविरुद्ध दोन्ही सामने जिंकले होते. नव्या मोसमात मंगळवारी (ता. २३) आणखी एक विजय नोंदवून हॅटट्रिक नोंदविण्याचा मानोलो मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा प्रयत्न असेल.

हैदराबाद व चेन्नईयीन एफसी यांच्यातील सामना मंगळवारी बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर होईल. स्पॅनिश मार्किझ यांचा हैदराबादचे प्रशिक्षक या नात्याने हा दुसरा मोसम आहे. गतमोसमात सहा विजय, अकरा बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांनी पाचवा क्रमांक मिळविला होता. हैदराबादला उपांत्य फेरी थोडक्यात हुकली होती. बार्थोलोमेव ओगबेचे, हावी सिव्हेरियो, जोएल चियानेज, एदू गार्सिया हे परदेशी, तसेच हालिचरण नरझारी, अनिकेत जाधव, महंमद यासीर यांच्यामुळे हैदराबादचा (Hyderabad) संघ स्थिरावल्यागत वाटतो.

सराव करताना हैदराबाद एफसी संघातील खेळाडू
महिला फुटबॉल संघाच्या कर्णधारपदी स्टेसी

चेन्नईची (Chennai) गतमोसमात कामगिरी लौकिकास साजेशी नव्हती. तीन विजय, अकरा बरोबरी व सहा पराभवासह ते आठव्या क्रमांकावर राहिले होते. दोन वेळचा माजी विजेता संघ यंदा नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. माँटेनेग्रोचे 52 वर्षीय प्रशिक्षक बोझिदार बँडोविच यांचा यंदा पहिलाच मोसम आहे. चेन्नईयीन एफसी संघात यंदा नव्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिरुद्ध थापा याच्याकडे चेन्नईयीनचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

गतमोसमात साखळी फेरीत चेन्नईयीनविरुद्ध हैदराबादने बांबोळी येथे 4-1 फरकाने, तर वास्को येथे 2-0 फरकाने विजय नोंदविला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com