आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग पंचगिरी आयोगावर गोव्याचे लेनींची वर्णी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

लेनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवी बॉक्सिंग पंच असून, त्यांनी विविध स्पर्धांत पंचगिरी केली आहे.

पणजी : गोव्यातील अनुभवी बॉक्सिंग प्रशासक आणि पंच लेनी डिगामा यांची आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या (एआयबीए) पंचगिरी आणि पडताळणी आयोगावर नियुक्ती झाली आहे. ते गोवा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्षही आहेत. लेनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभवी बॉक्सिंग पंच असून, त्यांनी विविध स्पर्धांत पंचगिरी केली आहे. प्रशासक या नात्याने गोव्यात त्यांनी बॉक्सिंग खेळाडूंच्या जडघडणीत मोलाचा वाटा उचलला, तसेच विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे राज्यात आयोजन करण्यात प्रमुख भूमिका बजावली आहे.

लेनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग पंचगिरीत कार्यरत आहेत. 2019 मध्ये रशियात झालेल्या एलिट महिला विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत त्यांनी पंचगिरी केली होती. गतवर्षी (2020) जानेवारी आफ्रिकेतील, तसेच मार्चमध्ये युरोपातील ऑलिंपिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेतही त्यांनी पंचगिरी केली होती. सध्या ते पोलंडमधील वॉर्सो येथे जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत पंच आहेत. येत्या मे महिन्यात ते अर्जेंटिनातील अमेरिका पात्रता बॉक्सिंग स्पर्धेतही पंच असतील. (Goa Lenis character on the International Boxing Punchgiri Commission)

Goa Professional League: सेझा अकादमीसाठी मिनेशचा गोल मौल्यवान

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या पंचगिरी आणि पडताळणी आयोगावरील नियुक्तीसह लेनी ऑलिंपिक तयारी समितीचेही सदस्य असतील. उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील साळगाव येथील लेनी 2017 साली आशियातील बॉक्सिंगमधील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (आयटीओ) ठरले होते. ते आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे प्रमाणित आयटीओ आहेत.

 

संबंधित बातम्या