तेजस्विनीची एकहाती झुंज व्यर्थ; महाराष्ट्राकडून गोव्याचा पराभव 

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 मार्च 2021

गोव्याच्या तेजस्विनी दुर्गड हिने झुंजार फलंदाजी करताना अर्धशतक नोंदविले, पण तिची एकहाती झुंज व्यर्थ ठरली. त्यामुळे सीनियर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याला महाराष्ट्राकडून 55 धावांनी हार पत्करावी लागली.

पणजी : गोव्याच्या तेजस्विनी दुर्गड हिने झुंजार फलंदाजी करताना अर्धशतक नोंदविले, पण तिची एकहाती झुंज व्यर्थ ठरली. त्यामुळे सीनियर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गोव्याला महाराष्ट्राकडून 55 धावांनी हार पत्करावी लागली.

सामना जयपूरमधील आरसीए अकादमी मैदानावर झाला. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 242 धावा केल्या, नंतर गोव्याची 6 बाद 81 अशी घसरगुंडी उडाली. तेजस्विनीने खिंड लढविताना सातव्या विकेटसाठी निकिता मळीक हिच्यासह 76 धावांची भागीदारी केली. तेजस्विनी बाद झाल्यानंतर ही भागीदारी फुटली आणि नंतर गोव्याला आव्हानाचा पाठलाग करणे जमले नाही. 46व्या षटकांत त्यांचा डाव 187 धावांत संपुष्टात आला. संजुलाने आक्रमक फलंदाजी करताना 65 चेंडूंतील खेळीत सहा चौकार व चार षटकारांच्या मदतीने 69 धावा केल्या.

 ICC कडून दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे निलंबन...

स्पर्धेत सलग दोन सामने जिंकल्यानंतर गोव्याचा हा पहिला पराभव ठरला. महाराष्ट्राचा हा तीन लढतीतील दुसरा विजय आहे.

संक्षिप्त धावफलक 

महाराष्ट्र : 50 षटकांत 7 बाद 242 (एम. आर. मगरे 47, एच. ए. देशमुख 30, एस. एस. शिंदे 20, ए. ए. पाटील नाबाद 88, ए. ए. गायकवाड 22, शिखा पांडे 8-1-34-0, निकिता मळीक 7-0-35-0, सुनंदा येत्रेकर 10-0-51-2, सोनाली गवंडर 2-0-8-0, रूपाली चव्हाण 8-0-42-3, संजुला नाईक 2-0-8-0, तेजस्विनी दुर्गड 10-0-53-2, दीक्षा गावडे 3-0-10-0) वि. वि. 

गोवा : 45.2 षटकांत सर्व बाद 187 (विनवी गुरव 29, पूर्वजा वेर्लेकर 16, सुनंदा येत्रेकर 0, शिखा पांडे 2, संजुला नाईक 12, तेजस्विनी दुर्गड 69, सुगंधा घाडी 3, निकिता मळीक 35, दीक्षा गावडे 10, सोनाली गवंडर 6, रूपाली चव्हाण नाबाद 0, पी. बी. गरखेडे 4-41, ए. ए. पाटील 2-29, एस. बी. पोखरकर 2-15).
 

संबंधित बातम्या