Goa Cricket: गोव्याने दुसरा सामनाही गमावला; तमिळनाडूची आगेकूच कायम

एकदिवसीय क्रिकेट: तमिळनाडूचा 57 धावांनी विजय, सामन्यात एकूण 689 धावा
All tickets for five of the six cricket matches
All tickets for five of the six cricket matches Dainik Gomantak

पणजी: तमिळनाडूने विजयासाठी 374 धावांचे आव्हान दिल्यानंतर गोव्याच्या फलंदाजांनीही जोरदार प्रयत्न केले, पण ते अखेरीस तोकडे पडले. विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या लढतीत तमिळनाडूने 57 धावांनी विजय मिळविला.

(Goa lost the match against Tamil Nadu in the Vijay Hazare Trophy ODI)

अळूर-बंगळूर येथे झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण 689 धावा केल्या. गोव्याने निर्धारित 50 षटकांत 316 धावा नोंदविल्या. गोव्याचा हा चार लढतीतील सलग दुसरा पराभव ठरला. त्यांचे सहा गुण कायम आहेत. पुढील लढतीत शनिवारी (ता. 19) गोव्याची गाठ कमजोर अरुणाचल प्रदेशसोबत पडेल. तमिळनाडूचा हा चार लढतीतील तिसरा विजय ठरला. त्यांचे 14 गुण झाले आहेत.

All tickets for five of the six cricket matches
Team India: न्यूझीलंडविरुद्ध या 5 स्फोटक फलंदाजांनी केल्या सर्वाधिक धावा !

पावणेतीनशे धावांची सलामी

गोव्याने नाणेफेक जिंकून तमिळनाडूस प्रथम फलंदाजी दिली, पण हा निर्णय अंगलट आला. तमिळनाडूचे सलामीवीर बी. साई सुदर्शन आणि नारायण जगदीश यांनी धडाकेबाज शतके नोंदविली. त्यांनी गोव्याच्या गोलंदाजीचा समाचार घेताना 40.4 षटकांत 276 धावांची भागीदारी केली. गोव्याला तब्बल आठ गोलंदाज वापरावे लागले.

साई सुदर्शन याने 112 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. जगदीशन याने 168 धावा करताना 140 चेंडूंतील खेळीत 15 चौकार व 6 षटकार मारले. जगदीशनचे हे सहावे, तर सुदर्शनचे दुसरे लिस्ट ए शतक ठरले.

All tickets for five of the six cricket matches
Ind vs Nz T20 Series: पांड्याच्या नेतृत्वाखाली शुक्रवारपासून T20 मालिका, प्लेइंग 11 मध्ये होणार मोठे बदल!

गोव्यातर्फे चौघांची अर्धशतके

गोव्याला ईशान गडेकर व स्नेहल कवठणकर याने 99 चेंडूंत 102 धावांची सलामी दिली, त्यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रेरणा मिळाली. तिसरा लिस्ट ए सामना खेळणाऱ्या डावखुऱ्या ईशानने कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक नोंदविले. त्याने 49 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकार मारताना 51 धावा केल्या. स्नेहलने नंतर एकनाथ केरकर याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचली. स्नेहल 67 धावांवर बाद झाला.

स्नेहलने 84 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार मारला. त्याचे हे सातवे अर्धशतक ठरले. एकनाथ 55 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 50 धावा करून बाद झाला. त्याने कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक केले. आक्रमक फलंदाज दीपराज गावकर याच्या साथीत सिद्धेश लाडने पाचव्या विकेटसाठी 58 चेंडूंत 77 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला आशा वाटू लागली. दीपराजने 3 षटकारांच्या मदतीने 31 चेंडूंत 42 धावा केल्या. गोव्यातर्फे दुसरे तर कारकिर्दीतील पाचवे अर्धशतक केलेला सिद्धेश 62 धावांवर नाबाद राहिला. त्याने 55 चेंडूंतील खेळीत 5 चौकार व 1 षटकार मारला.

संक्षिप्त धावफलक

तमिळनाडू : 50 षटकांत 4 बाद 373 (बी. साई सुदर्शन 117, नारायण जगदीशन 168, शाहरुख खान 29, बाबा अपराजित नाबाद 31, अर्जुन तेंडुलकर 10-0-61-2, लक्षय गर्ग 8-0-54-0, ऋत्विक नाईक 7-0-40-0, सुयश प्रभुदेसाई 10-0-87-2, दीपराज गावकर 1-0-18-0, सिद्धेश लाड 3-0-29-0, मोहित रेडकर 6-0-40-0, अमूल्य पांड्रेकर 5-0-40-0) वि. वि. गोवा : 50 षटकांत 6 बाद 316 (ईशान गडेकर 51, स्नेहल कवठणकर 67, एकनाथ केरकर 50, सुयश प्रभुदेसाई 11, सिद्धेश लाड नाबाद 62, दीपराज गावकर 42, मोहित रेडकर 16, लक्षय गर्ग नाबाद 10).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com