Goa U19's Cricket: वीर यादवच्या शतकी खेळीने 'गोव्या'चे वर्चस्व कायम

गुजरातमध्ये लालबहादूर शास्त्री मैदानावर चार दिवसीय सामन्यास सुरवात
Goa U19
Goa U19Dainik Gomantak

पणजी: सलामीच्या वीर यादव याचे खणखीत शतक गोव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध शनिवारी पहिल्या दिवसअखेर 119 धावांची आघाडी घेता आली.

(Goa maintains lead against Arunachal Pradesh in Cooch Behar Cup U-19 cricket match)

गुजरातमधील आनंद येथील लालबहादूर शास्त्री मैदानावर चार दिवसीय सामन्यास सुरवात झाली. यश कसवणकर (4-32) व कर्णधार दीप कसवणकर (4-46) यांच्या प्रभावी फिरकी गोलंदाजीच्या बळावर गोव्याने अरुणाचल प्रदेशचा डाव 99 धावांत गुंडाळला.

Goa U19
Rohit Sharma: T20 विश्वचषकातील पराभवानंतर हिट मॅनने उचलले हे पाऊल, दिसणार हटके अंदाजात !

गोव्याचीही 4 बाद 105 अशी घसरगुंडी उडाली. मात्र वीर याने जबाबदारीने खेळ केल्यामुळे गोव्याला दिवसअखेर 7 बाद 218 धावा करता आल्या. वीर याने यश कसवणकर (नाबाद 37) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. वीर याने 141 चेंडूंत 16 चौकारांच्या मदतीने 110 धावा केल्या.

Goa U19
IND vs NZ: 2nd T20 साठी पांड्याची धाकड Playing 11 तयार, या खेळाडूला मिळणार संधी

संक्षिप्त धावफलक

अरुणाचल प्रदेश, पहिला डाव: 35.1 षटकांत सर्वबाद 99 (टी. जेकब 32, आयुष अवस्थी 40, फरदीन खान 5-0-14-0, यश कसवणकर 15.1-5-32-4, दीप कसवणकर 13-4-46-4, अभिनंदन ठाकूर 2-1-4-0).

गोवा, पहिला डाव: 58.2 षटकांत 7 बाद 218 (वीर यादव 110, देवनकुमार चित्तेम 30, आर्यन नार्वेकर 3, सनथ नेवगी 16, दीप कसवणकर 1, यश कसवणकर नाबाद 37, इझान शेख 5, वर्धन मिस्कीन 8, टी. मुरी 3-36, आकाश माळी 4-51).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com