रायझिंगच्या नरकासुर प्रतिमा स्पर्धेत भावकई प्रथम

'नरकासुर प्रतिमा' स्पर्धेत भावकई क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने रोख 7 हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावले.
रायझिंगच्या नरकासुर प्रतिमा स्पर्धेत भावकई प्रथम
बक्षीस वितरण कार्यक्रमDainik Gomantak

डिचोली: रायझिंग युथ, मयेतर्फे घेण्यात आलेल्या मये मतदारसंघ (Maye Constituency) मर्यादित 'नरकासुर प्रतिमा' स्पर्धेत भावकई क्रीडा (Sports) आणि सांस्कृतिक (Cultural) मंडळाने रोख 7 हजार रुपयांचे प्रथम बक्षीस पटकावले. शुक्रवारी रात्री केळबायवाडा-मये येथील श्री केळबाई मंदिर सभागृहात आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. या कार्यक्रमास स्थानिक सरपंच सीमा आरोंदेकर, आयोजक मंडळाचे अध्यक्ष रुपेश ठाणेकर आणि रघुनाथ नाईक गावकर उपस्थित होते.

बक्षीस वितरण कार्यक्रम
गोव्याच्या महिलांचे आव्हान संपुष्टात ; पावसाच्या आगमनानंतर पंजाबचा 17 धावांनी विजय!

स्पर्धेतील बक्षीसप्राप्त (Prize) अन्य मंडळे पुढीलप्रमाणे-द्वितीय-दत्तात्रय बॉयज (वरपाल-हातुर्ली), तृतीय- शिवम च्यारी ग्रुप (म्हावळींगे), उत्तेजनार्थ-गोपाळकृष्ण युथ (एकतानगर-सर्वण), केशव आरोस्कर आणि ग्रुप (सारमानस-पिळगाव), सुसाईड स्कॅड (केरे-चोडण), चिमुलवाडा युथ (मये), आरएससी बॉयज (पिळगाव), तोणयेश्वर बॉयज (विठ्ठलापूर) आणि दीपक सरनाईक ग्रुप (म्हावळींगे). याशिवाय प्रवेशिका सादर केलेल्या वीस मंडळांना खास बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन सागर च्यारी यांनी केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com