गोव्याला रणजी करंडक क्रिकेट संघासाठी भासणार नव्या प्रशिक्षकाची गरज

दैनिक गोमंतक
शनिवार, 15 मे 2021

भारताचे माजी कसोटी वेगवान गोलंदाज दोड्डा गणेश यांच्या राजीनाम्यानंतर गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद रिक्त आहे

पणजी: भारताचे माजी कसोटी वेगवान गोलंदाज (Bowler) दोड्डा गणेश यांच्या राजीनाम्यानंतर गोव्याच्या रणजी करंडक क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद (Coaching position) रिक्त आहे, त्यामुळे गोवा क्रिकेट असोसिएशनला (GCA) नव्या मोसमासाठी प्रशिक्षकाची शोधमोहीम हाती घ्यावी लागेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोविड-१९ पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजनांसह २०२१-२२ मोसम खेळविल्यास गोव्याच्या सीनियर क्रिकेट संघाला रणजी करंडक स्पर्धेसह सय्यद मुश्ताक अली टी-20  आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळावे लागेल. सध्या प्रशिक्षकपद रिक्त असल्याने या जागी नव्या चेहऱ्याची वर्णी लागेल हे स्पष्ट आहे. प्राप्त माहितीनुसार, नव्या मोसमाची शक्यता लक्षात घेऊनच जीसीए नवा प्रशिक्षक नियुक्त करेल, सध्या तरी संघटनेला नियुक्तीची घाई नाही. (Goa needs a new coach)

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी न्यूझीलंडच्या खेळाडूचा आगळावेगळा सराव

दोड्डा गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचा संघ 2019-20 मोसमातील रणजी करंडक प्लेट स्पर्धेत खेळला. या गटात अव्वल स्थान मिळवत गोव्याने त्या मोसमात रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याचा मान मिळविला. त्या कामगिरीनुसार, गणेश यांना2020-21 मोसमासाठी मुदतवाढ मिळाली. कोविड महामारीमुळे रणजी करंडक स्पर्धा झाली नाही, मात्र टी-20 आणि एकदिवसीय स्पर्धेचे आयोजन झाले. 
इंदूर येथे जानेवारी महिन्यात झालेल्या टी-20 स्पर्धेत गोव्याने गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपैकी तीन सामने जिंकले, मात्र बाद फेरीसाठी पात्रता मिळविणे शक्य झाले नाही. नंतर फेब्रुवारीत एकदिवसीय स्पर्धेपूर्वी बंगळूर येथील गणेश यांनी आरोग्यस्वास्थाचे कारण देत प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी जीसीएचे प्रशिक्षण संचालक प्रकाश मयेकर यांच्याकडे संघाचा तात्पुरता ताबा देण्यात आला.

Video: कोण आहे जसप्रीत बुमराहचा गुरु?

एकदिवसीय स्पर्धेत गोव्याने एकमेव विजय नोंदविला. या पार्श्वभूमीवर, नव्या मोसमात पूर्णवेळ प्रशिक्षकाच्या नियुक्तीचे संकेत आहेत. सूत्राच्या माहितीनुसार, गोव्याच्या 19  वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक राजेश कामत यांच्याकडे रणजी संघाची सूत्रे देण्याबाबत जीसीए विचार करू शकते. कर्नाटकचे माजी रणजीपटू राजेश यांनी यापूर्वी 2009-10  व 2010-11 असे दोन मोसम गोव्याच्या रणजी संघाला मार्गदर्शन केले होते. 
गोव्याचे दशकभरातील रणजी संघ प्रशिक्षक
2011-12 मोसमात गोव्याचे माजी कर्णधार विवेक कोळंबकर प्रशिक्षकपदी
दोड्डा गणेश यांच्याकडे2012-13 व 2019-20. मध्ये जबाबदारीश्रीलंकेचे माजी कसोटीपटू नुवान झोयसा 2013-14  व 2014-15 मोसमात प्रशिक्षक भारताचे माजी कसोटी अष्टपैलू ह्रषीकेश कानिटकर याची 2015-16 मोसमासाठी नियुक्ती गोव्याचे माजी क्रिकेटपटू प्रकाश मयेकर 2016-17, 2017-18 , 2018-19  असे सलग तीन मोसम प्रशिक्षक

संबंधित बातम्या