Goa : पर्लचे सेलिंगमध्ये रूपेरी यश
Goa : Pearl ColvalcarDainik Gomantak

Goa : पर्लचे सेलिंगमध्ये रूपेरी यश

Goa : अनुभवी सेलरना मात देत ज्युनियर गटातील पर्लने रौप्यपदकाची कमाई

पणजीः राष्ट्रीय सीनियर सेलिंग (National Senior Sailing) स्पर्धेतील महिलांच्या लेझर रेडियल गटात गोव्याच्या (Goa) पंधरा वर्षीय पर्ल कोलवाळकर (Pearl Colvalcar) हिने शानदार कामगिरीद्वारे लक्ष वेधले. अनुभवी सेलरना मात देत ज्युनियर गटातील पर्लने रौप्यपदकाची कमाई केली. मुंबईत झालेल्या या स्पर्धेत टोकियो ऑलिंपिकमधील सहभागी 24 वर्षीय नेत्रा कुमानन हिने सुवर्णपदक जिंकले. लेझर रेडियल गटातील सर्व नऊही शर्यतीत पर्लने उल्लेखनीय सेलिंग केले. या गटातील ती सर्वांत युवा स्पर्धक होती. तुलनेत तिच्या प्रतिस्पर्धी जास्त अनुभवी आणि गेली कित्येक वर्षे सेलिंग करणाऱ्या होत्या. राष्ट्रीय सीनियर सेलिंगमध्ये रौप्यपदक जिंकल्यामुळे पर्ल हिला आता पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई सेलिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. पर्ल 2020 मधील प्रधानमंत्री राष्‍ट्रीय बाल पुरस्कार विजेती आहे.

Goa : Pearl Colvalcar
Goa : शारीरिक शिक्षण शिक्षकांत कार्यक्षमता आवश्यक

डेनने जिंकले रौप्यपदक

राष्ट्रीय सीनियर सेलिंग स्पर्धेत गोव्याच्या डेन कुएल्हो याने रौप्यपदकाची कमाई केली. पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड चाचणी असल्याने निकाल महत्त्वाचे आहेत, तसेच पहिल्या दोन स्पर्धकांची पुढील वर्षी होणाऱ्या आशियाई सेलिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड होईल. डेन याने आरएसःएक्स ऑलिंपिक गटात दुसरा क्रमांक मिळविला. त्याने व कात्या कुएल्हो यांनी यापूर्वी 2018 साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. डेन याला आता पुन्हा संधी आहे. गोवा सरकारच्या ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात उत्कष्टता प्राप्त’ योजनेअंतर्गत डेन 30 लाख रुपये अनुदान योजनेचा मानकरी आहे. अनुदानाच्या पहिल्या हप्त्याची डेनला प्रतीक्षा असून जेणेकरून आगामी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रता तयारीसाठी सुरवात करणे शक्य होईल, असे गोवा यॉटिंग असोसिएशनने नमूद केले आहे.

Goa : Pearl Colvalcar
Goa Sports: फुटबॉलपटू ब्रुनो यांचे क्रिकेट कौशल्य!

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com