गोवा प्रो-लीग फुटबॉल: धेंपो संघात अनुभवी मेलरॉय

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

अनुभवी गोलरक्षक मेलरॉय फर्नांडिस आगामी गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लबचे प्रतिनिधित्व करणार आहे.

पणजी: अनुभवी गोलरक्षक मेलरॉय फर्नांडिस आगामी गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धेत धेंपो स्पोर्टस क्लबचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याच्याशी क्लबने या मोसमाअखेरपर्यंत करार केला आहे.

मेलरॉय यापूर्वी साळगावकर एफसी, स्पोर्टिंग क्लब द गोवा, चर्चिल ब्रदर्स या गोव्यातील प्रमुख संघांतर्फे, तसेच एआरए एफसी संघातर्फे खेळला आहे. आय-लीग, तसेच संतोष करंडक स्पर्धेत खेळण्याचा अनुभवही त्याच्यापाशी आहे.

धेंपो आगामी प्रो-लीग स्पर्धेसाठी मध्यरक्षक रिचर्डा कार्दोझ आणि 22 वर्षीय युवा बचावपटू गौरव वायगणकर यांनाही करारबद्ध केले आहे.
 

संबंधित बातम्या