गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेत कळंगुटला सेझा अकादमीने रोखले

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 16 मार्च 2021

गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी सेझा फुटबॉल अकादमीने सुधारित खेळ करत कळंगुट असोसिएशनला गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

पणजी : गोवा प्रोफेशन लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी सेझा फुटबॉल अकादमीने सुधारित खेळ करत कळंगुट असोसिएशनला गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सामना झाला. मागील लढतीत धेंपो क्लबला पराजित केलेल्या कळंगुट असोसिएशनने मंगळवारी सेझा अकादमीचा बचाव भेदता आला नाही. सलग चार सामने अपराजित असलेल्या कळंगुट असोसिएशनने आता स्पर्धेत 13 गुण झाले आहेत. ओळीने तीन सामने जिंकल्यानंतर त्यांची ही पहिली बरोबरी ठरली. सेझा अकादमीची सलग दुसरी बरोबरी ठरली, त्यांचे आता तीन गुण झाले आहेत.

 ICC कडून दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे निलंबन...

सामन्याच्या पूर्वार्धात सेझा अकादमीस गोल करण्याच्या संधी होत्या, मायरन बोर्जिस आणि रिझबॉन फर्नांडिस चेंडूला अचूक दिशा दाखवू शकले नाहीत. सेझा अकादमीचा गोलरक्षक सपन याची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. त्याने कळंगुटच्या सिद्धांत शिरोडकरचा फटका रोखला, तसेच निक्सन कास्ताना याचा फ्रीकिक फटकाही उधळून लावला. उत्तरार्धात सिद्धांतचा आणखी एक प्रयत्न गोलरक्षक सपनने अडविल्यामुळे कळंगुटला आघाडी घेता आली नाही. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये सेझा अकादमीच्या कुणाल साळगावकर याचा प्रयत्न कळंगुटचा गोलरक्षक परमवीर याने अडविल्यामुळे गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राहिली.

 

संबंधित बातम्या