Goa Professional League: चर्चिल ब्रदर्सने पराभव टाळला; शेवटच्या मिनिटाला गोल नोंदवत मनोरा संघाला रोखले

Goa Professional League: चर्चिल ब्रदर्सने पराभव टाळला; शेवटच्या मिनिटाला गोल नोंदवत मनोरा संघाला रोखले
Goa Professional League: Churchill Brothers avoid defeat; Manora stopped the team by scoring a goal in the last minute

पणजी: सामन्याच्या शेवटच्या मिनिटास नोंदविलेल्या गोलमुळे माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी पराभव टाळता आला. त्यांनी नवोदित यूथ क्लब मनोरा संघाला 2-2 गोलबरोबरीत रोखले. सामना नावेली येथील रोझरी मैदानावर झाला.

सामन्याच्या शेवटच्या 90व्या मिनिटास मायरन मेंडिस याने नोंदविलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला बरोबरीचा एक गुण मिळाला. त्यापूर्वी मनोरा संघाने पिछाडीनंतर जबरदस्त मुसंडी मारत आघाडी घेतली होती. अॅनफोर्ड फर्नांडिसने 37व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळाली होती, नंतर उत्तरार्धात तीन मिनिटांत दोन गोल करून मनोरा संघाने चर्चिल ब्रदर्सला पिछाडीवर ढकलले. अॅनिस्टन फर्नांडिस याने 69व्या मिनिटास बरोबरीचा गोल नोंदविल्यानंतर 71व्या मिनिटास स्वीडन बार्बोझाच्या गोलमुळे मनोरा संघाची बाजू वरचढ झाली. (Goa Professional League: Churchill Brothers avoid defeat; Manora stopped the team by scoring a goal in the last minute)

धेंपो-वेळसाव सामना स्थगित

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने खेळाडूंचे बंधनकारक असलेले कोविड-19 चाचणी प्रमाणपत्र सादर केले नाही, त्यामुळे त्यांचा धेंपो स्पोर्टस क्लबविरुद्धचा सामना होऊ शकला नाही. ही लढत म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर मंगळवारी नियोजित होती. या सामन्याविषयी निर्णय आता गोवा फुटबॉल असोसिएशन घेणार आहे. लढतीपूर्वी नियमानुसार सामना खेळणाऱ्या संघाने सर्व खेळाडूंची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र आयोजकांना सादर करणे बंधनकारक आहे, पण ते वेळसाव क्लबने सादर न केल्यामुळे सामना सुरू होऊ शकला नाही, असे जीएफएतर्फे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com