वास्को क्लबला पूर्ण तीन गुण; चर्चिल ब्रदर्स संघावर दोन गोलने मात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 31 जानेवारी 2021

वास्को स्पोर्टस क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी पूर्ण तीन गुणांची कमाई करताना चर्चिल ब्रदर्सवर 2-0 फरकाने सहज मात केली.

पणजी :  वास्को स्पोर्टस क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी पूर्ण तीन गुणांची कमाई करताना चर्चिल ब्रदर्सवर 2-0 फरकाने सहज मात केली. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. मुख्य संघ कोलकाता येथे आय-लीग स्पर्धेत खेळत असल्याने गतविजेत्या चर्चिल ब्रदर्सने प्रोफेशनल लीग स्पर्धेत राखीव फळीतील खेळाडूंचा संघ उतरविला आहे.

नॉर्थईस्टकडून मुंबई सिटीस`ब्राऊन वॉश`पराभवामुळे लोबेरांच्या संघाची अपराजित...

ज्योकिम अब्रांचिस व फ्रान्सिस फर्नांडिस या अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या वास्को क्लबचे लढतीत पारडे जड राहिले. वास्कोच्या संघासाठी पहिला गोल नवव्या मिनिटास ज्योकिम अब्रांचिस याने नोंदविला. नंतर 69व्या मिनिटास मॅथ्यू कुलासो याने वास्कोची आघाडी मजबूत केली. चर्चिल ब्रदर्सच्या माविन बोर्जिस याचा पूर्वार्धातील फटका गोलरक्षक संजू थापा याने अडविल्यामुळे वास्को क्लबला क्लीन शीट राखता आली.

हैदराबादची नजर तिसऱ्या क्रमांकावर- चेन्नईशी गाठ; एटीके मोहन बागानला केरळा...

संबंधित बातम्या