Goa Professional League: शिरवडे क्लबची थेट मुख्य फेरीत धडक

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 1 एप्रिल 2021

शिरवडे क्लबला थेट मुख्य फेरीत प्रवेश देण्याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे कळविण्यात आल्याची माहिती गोवा फुटबॉल असोसिएशनने  गुरुवारी दिली.

पणजी: गोवा महिला लीग फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या शिरवडे स्पोर्टस क्लबला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या भारतीय महिला लीग (आयडब्ल्यूएल) फुटबॉल स्पर्धेच्या थेट मुख्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. शिरवडे क्लबला थेट मुख्य फेरीत प्रवेश देण्याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघातर्फे कळविण्यात आल्याची माहिती गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) गुरुवारी दिली. शिरवडे क्लबने गोवा महिला लीग स्पर्धेत अपराजित राहत सर्वाधिक 22 गुणांसह बुधवारी विजेतेपद मिळविले. 

महासंघाच्या महिला लीग विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक इंदू चौधरी यांनी जीएफएला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय महिला लीग फुटबॉल स्पर्धेची मुख्य फेरी ओडिशातील भुवनेश्वर येथे 23 एप्रिल ते 27 मे या कालावधीत खेळली जाईल. या स्पर्धेतील प्रत्येक संघात 23 खेळाडू आणि 4 अधिकाऱ्यांचा समावेश असेल. (Goa Professional League Shirwade Club in the main round)

Goa Professional League: कळंगुटची बरोबरी स्पोर्टिंग क्लबला 2-2 मध्ये रोखले

शिरवडे क्लबला भारतीय महिला लीग स्पर्धेच्या थेट मुख्य फेरीत प्रवेश मिळाल्याबद्दल जीएफएचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी समाधान व्यक्त केले आहे. भारतीय महिला लीग स्पर्धेत गोव्यातील विजेत्या संघाला थेट मुख्य फेरीत प्रवेश देण्याबाबतचे जीएफएचे प्रयत्न सफल ठरले आहेत. गोव्यातील महिला लीगच्या उत्तम आयोजनाची महासंघाने दखल घेतली, असे आलेमाव यांनी नमूद केले. गोवा महिला लीग फुटबॉल स्पर्धा महिनाभराच्या कालावधीत एकूण पाच संघांत खेळली गेली. त्यात शंभरहून जास्त महिला फुटबॉलपटूंनी भाग घेतला.
 

संबंधित बातम्या