Goa Professional League: पिछाडीवरून स्पोर्टिंगची `टेन मेन` धेंपोशी बरोबरी

Goa Professional League: Sporting on par with 'Ten Men' Dhemposhi
Goa Professional League: Sporting on par with 'Ten Men' Dhemposhi

पणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील अतिशय उत्कंठावर्धक लढतीत स्पोर्टिंग क्लबने पिछाडीवरून धेंपो स्पोर्टस क्लबला 4-4 गोल बरोबरीत रोखले. म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर बुधवारी सामना झाला. धेंपो क्लबला लढतीतील शेवटची तीस मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

उत्तम राय याची हॅटट्रिक व डेस्मन परेरा याचा एक गोल यामुळे धेंपो क्लब विश्रांतीला 4-2 फरकाने आघाडीवर होता. स्पोर्टिंग क्लबसाठी पूर्वार्धातील खेळात गौरव काणकोणकर व कुणाल कुंडईकर यांनी प्रत्येकी एक गोल केला, नंतर उत्तरार्धात गौरव व जोएल यांच्या प्रत्येकी एक गोलमुळे स्पोर्टिंगला बरोबरी साधता आली. उत्तरार्धात कीर्तिकेश गडेकर याला रेड कार्ड मिळाल्यामुळे धेंपो क्लबचा एक खेळाडू कमी झाला, त्याचा फटका त्यांना बसला व आघाडीही निसटली. बरोबरीच्या एका गुणामुळे स्पोर्टिंग क्लबचे 20 गुणांसह अग्रस्थान कायम राहिले, तर धेंपो क्लब 18 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. (Goa Professional League: Sporting on par with 'Ten Men' Dhemposhi)

स्पोर्टिंग क्लबने सामन्याच्या पाचव्या मिनिटास आघाडी प्राप्त केली. अकेराज मार्टिन्सच्या असिस्टवर गौरवने स्पोर्टिंगला आघाडी मिळवून दिली. मात्र नंतर आठव्या मिनिटास धेंपो क्लबने बरोबरी साधली. शालम पिरीसच्या लाँग पासवर उत्तम रायने सामन्यातील पहिला वैयक्तिक गोल केला. त्यानंतर दहाव्या मिनिटास स्पोर्टिंगच्या जोएल याने धेंपो क्लबच्या पेद्रू गोन्साल्विस याचा फटका गोलक्षेत्रात हाताळला. यावेळी मिळालेल्या पेनल्टी फटक्यावर उत्तम रायने धेंपो क्लबला अचूक लक्ष्य साधत 2-1 आघाडी मिळवून दिली. 27व्या मिनिटास उत्तमच्या असिस्टवर डेस्मन परेराच्या भेदक हेडिंगमुळे धेंपो क्लबच्या खाती 3-1 अशी भक्कम आघाडी जमा झाली. डेस्मनच्या पासवर उत्तमने 29व्या मिनिटास हॅटट्रिकचा मान मिळवत धेंपो क्लबची आघाडी आणखी भक्कम केली. 

विश्रांतीपूर्वी स्पोर्टिंग क्लबला पेनल्टी फटका मिळाला. धेंपो क्लबच्या शालम पिरीसने पेनल्टी क्षेत्रात स्पोर्टिंग क्लबचा बदली खेळाडू फिलिप ओदोग्वू याला पाडण्याची चूक केली. कुणाल कुंडईकरने स्पॉट किकवरून अचूक नेम साधला व स्पोर्टिंगची पिछाडी 2-4 अशी कमी झाली. सामन्याच्या साठाव्या मिनिटास धेंपो क्लबला धक्का बसला. सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे धेंपो क्लबच्या कीर्तिकेशला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. यावेळी मिळालेल्या फ्रीकिकवर गौरवचा फटका धेंपो क्लबच्या मेलरॉय फर्नांडिसने रोखला, पण रिबाऊंडवर जोएलने स्पोर्टिंगची पिछाडी 3-4 अशी कमी केली. 68व्या मिनिटास गौरवने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून स्पोर्टिंगला 4-4 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर फिलिप ओदोग्वू याने हेडिंग साधताना नेम चुकविल्यामुळे स्पोर्टिंगला थरारक विजय नोंदविण्याची संधी हुकली. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com