Goa Professional League : यूथ क्लब मनोराची विजयी चमक; वेळसाव क्लबवर एका गोलने निसटती मात

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 23 मार्च 2021

वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबवर 1-0 फरकाने निसटती मात केली.

पणजी: सामन्याच्या पूर्वार्धात गोलच्या बळावर यूथ क्लब मनोरा संघाने मंगळवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबवर 1-0 फरकाने निसटती मात केली. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

यूथ क्लब मनोरा संघाला पूर्ण तीन गुण मिळवून देणारा गोल निकोलस फर्नांडिस याने 34व्या मिनिटास केला. यूथ क्लब मनोरा संघाचे आता आठ लढतीनंतर सात गुण झाले आहेत. वेळसाव क्लबला हा पाचवा पराभव ठरला. नऊ लढतीनंतर त्यांचे 13 गुण कायम आहेत. (Goa Professional League The triumphant glow of the Youth Club tower Velsav beat the club by one goal)

Goa Professional League : चर्चिल ब्रदर्सच्या विजयात फ्रँकीचा धडाका

निकोलसचा गोल प्रेक्षणीय ठरला. त्याने वेळसाव क्लबच्या दोघा बचावपटूंना कौशल्यपूर्णरीत्या गुंगारा दिला. त्यानंतर आणखी एका बचावपटूस चकवा देत त्याने वेळसाव क्लबचा गोलरक्षक प्रेस्ली मस्कारेन्हास यालाही असाह्य ठरविले. विश्रांतीपूर्वी निकोलसच्या क्रॉस पासवर एल्डन कुलासो याचा फटका गोलरक्षक प्रेस्ली याने वेळीच रोखल्यामुळे मनोरा क्लबची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

संबंधित बातम्या