Goa Professional League: इंज्युरी टाईम गोलमुळे वास्को विजयी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 14 एप्रिल 2021

सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये डेनिल रिबेलो याने गोल नोंदवत वास्को क्लबला 2-1 आघाडी प्राप्त करून दिली.

पणजी: अतिशय चुरशीच्या लढतीत वास्को स्पोर्टस क्लबने एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाला 2-1 फरकाने हरवून गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेची अखेर विजयाने केली. दहा खेळाडूंसह खेळलेल्या वास्को क्लबसाठी इंज्युरी टाईम गोल निर्णायक ठरला.

सामना बुधवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. लढत चांगलीच नाट्यमय ठरली. साठ मिनिटांच्या खेळानंतर अतिआक्रमकतेमुळे रेफरीने वास्को क्लबचे मुख्य प्रशिक्षक मिकी फर्नांडिस यांना रेड कार्ड दाखविले. त्यानंतर कपिल होबळेच्या असिस्टवर डेल्टन कुलासो याने एफसी गोवा संघास आघाडी मिळवून दिली, पण त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही. लगेच मॅथ्यू कुलासोने वास्को क्लबला बरोबरी साधून दिली. (Goa Professional League Vasco wins due to injury time goal)

Goa Professional League: पिछाडीवरून सेझा अकादमीची बाजी

सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये डेनिल रिबेलो याने गोल नोंदवत वास्को क्लबला 2-1 आघाडी प्राप्त करून दिली. त्यानंतर लगेच सॅन्विल डिकॉस्ता याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले, परंतु त्याचा लाभ एफसी गोवा उठवता आला नाही. 
 

संबंधित बातम्या