गोव्याच्या महिलांसमोर पंजाबच्या फलंदाजीचे आव्हान

उपउपांत्यपूर्व लढतीत बंगळूरमधील पावसाळी हवामानाचा व्यत्यय शक्य
गोव्याच्या महिलांसमोर पंजाबच्या फलंदाजीचे आव्हान
गोव्यातील क्रिकेट टीम Dainik Gomantak

पणजी: सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत (Cricket competitions) पंजाबने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत बाद फेरी गाठली, साहजिकच उपउपांत्यपूर्व लढतीत गोव्याच्या गोलंदाजांसमोर प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचे आव्हान असेल. सामना बंगळूर येथे शनिवारी खेळला जाईल, त्यावेळी तेथील पावसाळी हवामानाचा व्यत्ययही अपेक्षित आहे.

गोव्याने चार विजय व एका पराभवासह एलिट ड गटातून उपउपांत्यपूर्व (Semifinals) फेरी गाठली. या गटातील सामने विशाखापट्टणम व विझियानगरम येथे झाले. पंजाबनेही एलिट क गटात गोव्याप्रमाणेच कामगिरी करताना चार सामने जिंकले व एक पराभव पत्करला.

एलिट ड गट साखळी फेरीत गोव्याला मध्य प्रदेशकडून हार पत्करावी लागली, तर विदर्भ, हरियाना, गुजरात, मिझोराम या संघावर शानदार विजयाची नोंद केली. गोव्याच्या गोलंदाजांनी स्पर्धेत धारदार मारा केला आहे. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीत गोव्याचा संघ समतोल आहे.

दुबळ्या मिझोरामला अवघ्या 58 धावांत गुंडाळले होते. फिरकी गोलंदाजीत रूपाली चव्हाणने 9 , सुनंदा येत्रेकरने 7, पूर्वा भाईडकरने 6 विकेट घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाजीत कर्णधार शिखा पांडे हिने 6, तर निकिता मळीक हिने 5 गडी बाद केले आहेत. फलंदाजीत पूर्वजा वेर्लेकर, तेजस्विनी दुर्गद, श्रेया परब, शिखा पांडे, सुनंदा येत्रेकर यांनी चांगला फॉर्म प्रदर्शित केला आहे. पूर्वजा (56) व तेजस्विनीने (50) अर्धशतकाची नोंद केली. जिंकलेल्या चारपैकी दोन सामन्यात गोव्यात जोमदार फलंदाजीसह लक्ष्य पार केले आहे. हरियानाविरुद्ध दोनशे धावांचा टप्पा पार केला.

गोव्यातील क्रिकेट टीम
मुख्यमंत्री चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल जाहीर

पंजाबची दमदार फलंदाजी :

पंजाबची (Punjab) कर्णधार तानिया भाटिया, रिधिमा अगरवाल, परवीन खान, कनिका आहुजा यांनी फलंदाजीत सातत्य प्रदर्शित केले आहे. हैदराबाद, आंध्रविरुद्ध त्यांनी द्विशतकी टप्पा ओलांडला. आंध्रविरुद्ध पंजाबने 6 बाद 231 धावा करत फलंदाजीतील सामर्थ्य प्रदर्शित केले होते. त्यामुळे गोव्याला गोलंदाजीत सावध राहावे लागेल. तानिया ही शिखाची भारतीय संघातील सहकारी आहे.

तीन वर्षांपूर्वी गोव्याची बाजी:

सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या (Women's cricket competition) एलिट गटात गोवा आणि पंजाब यांच्यातील शेवटचा सामना 12 डिसेंबर 2018 रोजी आंध्र प्रदेशमधील मुलापाडू येथे झाला होता. तेव्हा गोव्याने 8 विकेट राखून दणदणीत विजय प्राप्त केला होता. पंजाबला 49.1 षटकांत 187 धावांत गुंडाळल्यानंतर गोव्याने 42.2 षटकांत 2 बाद 190 धावा करून सामना जिंकला. गोव्यातर्फे रूपालीने 4 व सुनंदाने 3 विकेट मिळविल्या होत्या, तर फलंदाजीत विनवी गुरव (73) व शिखा (71) यांनी नाबाद अर्धशतके नोंदविली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com