Goa रिव्हर मॅरेथॉन डिसेंबरमध्ये
गोवा (Goa) रिव्हर मॅरेथॉनचे (River Marathon) यंदा अकरावे वर्ष आहे. यावेळची स्पर्धा येत्या 12 डिसेंबर रोजी नियोजित असून शर्यतीस चिखली-वास्को येथून सुरवात होईल. Dainik Gomantak

Goa रिव्हर मॅरेथॉन डिसेंबरमध्ये

मॅरेथॉनच्या कालावधीत सरकारचे कोविड-19 (Covid 19) प्रतिबंधक मार्गदर्शक शिष्टाचाराची अंमलबजावणी केली जाईल, असे बांदेकर यांनी नमूद केले.

पणजी: गोवा (Goa) रिव्हर मॅरेथॉनचे (River Marathon) यंदा अकरावे वर्ष आहे. यावेळची स्पर्धा येत्या 12 डिसेंबर रोजी नियोजित असून शर्यतीस चिखली-वास्को येथून सुरवात होईल. मॅरेथॉनला एसकेएफ इंडियाचे सहकार्य लाभत असून वास्को स्पोर्टस क्लब (Vasco Sports Club) प्रमोटर आहेत. ही माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत वास्को क्लबचे अध्यक्ष नितीन बांदेकर (Nitin Bandekar) यांनी दिली.

गोवा (Goa) रिव्हर मॅरेथॉनचे (River Marathon) यंदा अकरावे वर्ष आहे. यावेळची स्पर्धा येत्या 12 डिसेंबर रोजी नियोजित असून शर्यतीस चिखली-वास्को येथून सुरवात होईल.
Goa Sports: एफसी गोवा संघात ऑस्ट्रेलियन बचावपटू

गोवा रिव्हर मॅरेथॉन मुख्य गटात 42 किलोमीटरची असेल, अर्ध मॅरेथॉन 21 किलोमीटर अंतराची असेल, तर 10 किलोमीटर शर्यतही घेण्यात येईल. मॅरेथॉनसाठी नोंदणी प्रक्रिया गुरुवारपासून (ता. 2) या www.skfgoarivermarathon.com संकेतस्थळावर सुरू होईल आणि 28 नोव्हेंबरपर्यं ही प्रक्रिया असेल.

गोवा (Goa) रिव्हर मॅरेथॉनचे (River Marathon) यंदा अकरावे वर्ष आहे. यावेळची स्पर्धा येत्या 12 डिसेंबर रोजी नियोजित असून शर्यतीस चिखली-वास्को येथून सुरवात होईल.
Goa: महिला फुटबॉल महोत्सवात एफ सी गोवा विजेता

कोरोना विषाणू महामारीमुळे सुरक्षितेवर जास्त भर देताना यंदा स्पर्धकांची संख्या मर्यादित असेल. त्यामुळे प्रथम नोंदणी तत्त्वावर ॲथलिट्सना प्राधान्य दिले जाईल. धावपटूंना पूर्ण लसीकरण प्रमाणपत्र सादर करावे लागेल. मॅरेथॉनच्या कालावधीत सरकारचे कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक शिष्टाचाराची अंमलबजावणी केली जाईल, असे बांदेकर यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेस एसकेएफ इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मनीष भटनागर उपस्थित होते. देश कोविड-19 महामारीतून सावरत आहे, या पार्श्वभूमीवर गोवा रिव्हर मॅरेथॉनचे आयोजन धावपटूंसाठी आश्वासक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गोव्यातील ही मॅरेथॉन धावपटूंत लोकप्रिय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com