साखळीत खास महिलांसाठी होणार बॅडमिंटन स्पर्धा

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

खास महिलांसाठी बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात येईल. साखळी बहुउद्देशीय सभागृहात होणाऱ्या स्पर्धेत राज्यभरातील ४० महिला खेळाडूंचा सहभाग असेल.

पणजी: साखळी शटलर्स यांच्यातर्फे गोवा बॅडमिंटन असोसिएशनच्या सहकार्याने शनिवारी (ता. १२) व रविवारी (ता. १३) खास महिलांसाठी बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात येईल. साखळी बहुउद्देशीय सभागृहात होणाऱ्या स्पर्धेत राज्यभरातील ४० महिला खेळाडूंचा सहभाग असेल.

गुणवान उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटूंना त्यांचे कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी आणि प्रगतीसाठी स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा या स्पर्धा आयोजनाचा मुख्य उद्देश आहे, असे साखळी शटलर्सचे अध्यक्ष यशवंत देसाई यांनी सांगितले. या स्पर्धेत महिला दुहेरीत २० जोड्यांनी सहभाग पक्का केला आहे. केवळ महिलांना केंद्रस्थानी राखून स्पर्धा आयोजित करणाऱ्या साखळी शटलर्सचे गोवा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव संदीप हेबळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा:

साखळी शटलर्सची नवी कार्यकारिणी

पुढील चार वर्षांसाठी साखळी शटलर्सची व्यवस्थापकीय समिती बिनविरोध निवडण्यात आली आहे. यशवंत देसाई यांची अध्यक्षपदी, तर कुणाल खानविलकर यांची सचिवपदी निवड झाली. प्रल्हाद धावसकर (उपाध्यक्ष), प्रसाद आजगावकर (संयुक्त सचिव), सचिन प्रभू (खजिनदार), रोहिदास घाडी (संयुक्त खजिनदार) हे पदाधिकारी, तर बाळा सावंत, मुस्तफा अब्दुल्ला, जयेश पटेल, सिद्धेश आमोणकर, करण धावसकर, श्याम पेडणेकर, कृष्णा वळवईकर, प्रवीण गावकर, आनंद सुतार हे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आहेत.

संबंधित बातम्या