गोवा: 18 वर्षांखालील राज्यस्तरीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत सयुरी नाईकची बाजी

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 जून 2021

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या18 वर्षांखालील राज्यस्तरीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत मुलींत सयुरी नाईक हिने, तर मुलांत रूबेन कुलासो याने अव्वल कामगिरी बजावली.

पणजी : गोवा बुद्धिबळ संघटनेच्या (Goa Chess Association) 18 वर्षांखालील राज्यस्तरीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत मुलींत सयुरी नाईक (Sayuri Naik) हिने, तर मुलांत रूबेन कुलासो याने अव्वल कामगिरी बजावली. कोरोना विषाणू महामारीमुळे ऑफलाईन स्पर्धा शक्य नसल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर (Online platform) घेण्यात आली.

म्हापसा (Mhapsa) येथील जी. एस. आमोणकर विद्यामंदिर शाळेत शिकणाऱ्या सयुरी नाईक हिने मुलींत चार गुण नोंदविले. श्रीलक्ष्मी कामत हिला दुसरा, तर जेनिसा सिक्वेरा हिला तिसरा क्रमांक मिळाला. तन्वी हडकोणकर हिला चौथ्या, सानी गावस हिला पाचव्या, तर नेत्रा सावईकर हिला सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Indian Super League: गोलरक्षक नवाझला एफसी गोवाचा निरोप

मुलांत मडगावच्या (Madgaon) लॉयला हायस्कूलचा विद्यार्थी रूबेन कुलासो (Reuben Culaso) याने अपराजित कामगिरी नोंदविताना सहापैकी पाच डाव जिंकले व एक डाव बरोबरीत राखला. साईराज वेर्णेकर याला दुसरा, तर पार्थ साळवी याला तिसरा क्रमांक प्राप्त झाला. व्हिवान बाळ्ळीकर चौथ्या, मंदार लाड पाचव्या, तर जॉय काकोडकर सहाव्या स्थानी राहिला.

स्पर्धेतील खुल्या व मुलींच्या गटातील पहिले दोन्ही स्पर्धक राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन 18 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा 10 ते 12 जून या कालावधीत होईल.
 

संबंधित बातम्या