Goa : आयएसएलमध्ये कोरो, आंगुलोच्या वारसदाराचा शोध

 Goa : आयएसएलमध्ये कोरो, आंगुलोच्या वारसदाराचा शोध
Goa: Search for Koro, Angulo successor in ISL

पणजी :  इंडियन सुपर लीग (आयएसएल) (ISL) फुटबॉल स्पर्धेत आक्रमकतेला गोल नोंदविण्याची जोड देत शैलीदार खेळ हे एफसी गोवाचे वैशिष्ट्य आहे. त्यास अनुसरून आता फेरान कोरोमिनास (Corominas) आणि इगोर आंगुलो (Igor Angulo) यांची परंपरा जपणारा नवा स्ट्रायकर निवडण्याचे माजी आयएसएल उपविजेत्यांनी निश्चित केले आहे.(Goa: Search for Koro, Angulo's successor in ISL)

एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी प्रसिद्धी माध्यमांस दिलेल्या माहितीनुसार आघाडीफळीतील नवा खेळाडू या महिन्याच्या अखेरपर्यंत निश्चित होईल. त्यामुळे गतमोसमात 14 गोलसह गोल्डन बूट जिंकलेला 37 वर्षीय स्पॅनिश इगोर आंगुलो संघात नसेल हे सुद्धा उघड झाले आहे. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी एफसी गोवाने आंगुलोस संघात सामावले नव्हते.

आंगुलो याच्यापूर्वी स्पेनच्याच फेरान कोरोमिनास (कोरो) याने एफसी गोवातर्फे आयएसएल स्पर्धेत ठसा उमटविला होता. दोन वेळा गोल्डन बूट किताब जिंकताना या शार्पशूटर आघाडीपटूने एकूण तीन मोसमात 48 गोल नोंदविले. आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविण्याचा विक्रम सध्या कोरो याच्या नावावर आहे. एफसी गोवाच्या आघाडीफळीत सलग तीन मोसम तो आक्रमणातील प्रमुख सूत्रधार होता.

आगामी आठव्या मोसमापूर्वी कोरो आणि आंगुलो यांचा संगम साधणारा आघाडीपटू एफसी गोवा सध्या शोधत आहे. मागे स्पेनच्या दिओनी व्हिलाल्बा याचे नाव चर्चेत होते, पण त्याने भारतातील कोविड-19 पार्श्वभूमीवर माघार घेतल्याचे वृत्त आहे. लवकरच नव्या स्ट्रायकरची घोषणा करू, या महिन्याच्या अखेपर्यंत करारपत्रावरील सही होईल, असे पुस्कुर यांनी हल्लीच माध्यमांना सांगितले. मोसमात किमान 15 गोल नोंदविणारा स्ट्रायकर हवा आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com