Goa: स्पोर्टिंग, साळगावकर संघाचे दमदार विजय

तासा गोवा फुटबॉल स्पर्धेत अनुक्रमे गार्डियन एंजल, वास्को क्लबवर मात
Goa: स्पोर्टिंग, साळगावकर संघाचे दमदार विजय
Football Dainik Gomantak

पणजी: गोवा फुटबॉल (Football) असोसिएशनच्या 20 वर्षांखालील तासा गोवा लीग फुटबॉल स्पर्धेत सोमवारी स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि साळगावकर एफसी संघाने दमदार विजयाची नोंद केली.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर स्पोर्टिंग क्लबने गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबचा 4-0 फरकाने धुव्वा उडविला. सामन्याच्या दहाव्या मिनिटास केन मौरा याने केलेल्या गोलमुळे विश्रांतीला स्पोर्टिंग क्लब (Sporting Club) एका गोलने आघाडीवर होता. उत्तरार्धात त्यांनी आणखी तीन गोल नोंदविले. त्यापैकी दोन गोल रिची वाझ याने केले. त्याने अनुक्रमे 50 व 79 व्या मिनिटास अचूक नेम साधला. सामन्याच्या भरपाई वेळेत गोल करून प्रतीक नाईकने स्पोर्टिंगच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Football
Goa: हैदराबादला चेन्नईयीनविरुद्ध हॅटट्रिकची संधी

धर्मापूर (Dharmapur) मैदानावर साळगावकर FC ने वास्को स्पोर्टस क्लबवर 2-0 फरकाने मात केली. या लढतीत दोन्ही संघांना प्रत्येकी 10 खेळाडूंसह खेळावे लागले. सामन्याच्या 20 व्या मिनिटास अंतुश मोनिझ याने साळगावकर संघाला आघाडी मिळवून दिली. रिचर्ड फर्नांडिसने (Richard Fernandes) 86 व्या मिनिटास गोल करून साळगावकरचा विजय निश्चित केला. धोकादायक खेळाबद्दल रेफरीने वास्कोच्या रोहन व साळगावकरच्या सिडनी याला रेड कार्ड दाखविले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com