चर्चिल ब्रदर्सचा पहिला विजय..!

तासा गोवा लीग फुटबॉल स्पर्धेत पणजी फुटबॉलर्सवर मात..
चर्चिल ब्रदर्सचा पहिला विजय..!
Goa Sports : चर्चिल ब्रदर्सचा पहिला विजय..!Dainik Gomantak

पणजी: सामन्याच्या उत्तरार्धात दहा मिनिटांत दोन गोल नोंदवून चर्चिल ब्रदर्सने रविवारी गोवा फुटबॉल (Goa Sports) असोसिएशनच्या 20 वर्षांखालील तासा गोवा लीग फुटबॉल स्पर्धेत पहिला सामना जिंकला. त्यांनी पणजी फुटबॉलर्सला 2-1 फरकाने हरविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

Goa Sports : चर्चिल ब्रदर्सचा पहिला विजय..!
क्रीडा मैदानाच्या जागेत 'एमआरएफ' शेडला विरोध..

पूर्वार्धात पणजी फुटबॉलर्सने गोल नोंदवत आघाडी घेतली होती. मॅक्झिमो डिकॉस्ता याने पाचव्याच मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. उत्तरार्धात चर्चिल ब्रदर्सने पिछाडीवरून मुसंडी मारली. ज्योबर्न फर्नांडिस याने 65व्या मिनिटास बरोबरीचा गोल केल्यानंतर लॉरेन फर्नांडिस याने 75व्या मिनिटास चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली. अखेरीस हाच गोल निर्णायक ठरला. साळगावकर एफसी व यूथ क्लब मनोरा संघाविरुद्ध बरोबरी नोंदविलेल्या चर्चिल ब्रदर्सचे आता विजयामुळे तीन लढतीतून पाच गुण झाले आहेत.

स्पर्धेत सोमवारी (ता. 22) दोन सामने होतील. धर्मापूर येथील मैदानावर साळगावकर एफसी व वास्को स्पोर्टस क्लब यांच्यात, तर धुळेर-म्हापसा येथे स्पोर्टिंग क्लब द गोवा व गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब यांच्यात लढत होईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com