एफसी गोवासाठी नवा मोसम, नवा अध्याय

प्रशिक्षक फेरांडो यांचे प्रतिपादन: भूतकाळातील कामगिरी इतिहासजमा
एफसी गोवासाठी नवा मोसम, नवा अध्याय
Goa Sports : FC Goa begins preparations for new performance Dainik Gomantak

पणजी: एफसी गोवाची (FC Goa) मागील कामगिरी इतिहासजमा (History) झाली आहे. आता `नवा अध्याय, नवा मोसम’ (Goa Sports) हे लक्ष्य बाळगून संघाने आगामी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धा तयारीवर भर दिल्याचे मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी बुधवारी सांगितले.

Goa Sports : FC Goa begins preparations for new performance
महागाई विरोधात काँग्रेसचे डिचोलीत जनजागृती अभियान

एफसी गोवाचा मोसमपूर्व ‘मीडिया डे’ बुधवारी झाला. त्यावेळी 40 वर्षीय फेरांडो यांनी विविध विषयावर मतप्रदर्शन केले. एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक या नात्याने त्यांचा यंदा दुसरा मोसम आहे. गतमोसमात एफसी गोवाने आयएसएल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. 2021-22 मोसमातील त्यांचा पहिला सामना 22 नोव्हेंबरला गतविजेते मुंबई सिटी एफसीविरुद्ध फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. एफसी गोवा संघ गतमोसमात सलग 15 सामने अपराजित राहिला होता.

आगामी मोसमाविषयी स्पॅनिश फेरांडो म्हणाले, की ‘‘आमच्यावर अजिबात दबाव नाही. करंडक हुकला याबाबत चर्चा नको. भूतकाळातील कामगिरी इतिहासजमा झाली आहे. आता नवा अध्याय आणि नवा मोसम याबाबत आम्ही विचार करत आहोत. हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. प्रत्येक दिवशी प्रगती साधण्याचे लक्ष्य आहे आणि माझा संघ प्रगती साधू शकतो हा पूर्ण विश्वास आहे. लीगसाठी आमचे खेळाडू सज्ज आहेत.’’

Goa Sports : FC Goa begins preparations for new performance
चर्चिल आणि वालांका लवकरच तृणमूलवासी

भारतीय खेळाडूंसाठी नवे आव्हान: ब्रँडन

यावेळच्या आयएसएल स्पर्धेपासून परदेशी खेळाडूंची संख्या घटविण्यात आली आहे. सामन्यात प्रत्येक संघात सात भारतीय आणि चार परदेशी खेळाडू असतील. याविषयी संघातील अनुभवी मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिस याने सांगितले, की ‘‘जास्त संधी मिळत असल्याने भारतीय खेळाडूंसाठी हे नवे आव्हान आहे. भारतीय खेळाडूंनी आता पुढे सरसावणे आवश्यक आहे. संघासाठी जास्त योगदान द्यावे लागेल आणि परदेशी खेळाडू मदतीसाठी असतीलच.’’ आयएसएलमध्ये पुन्हा एकदा रिकाम्या स्टेडियमवर खेळावे लागत असल्याबद्दल निराशा व्यक्त करून परिस्थितीस सामोरे जाणे आवश्यक असल्याचेही मत या 27 वर्षीय खेळाडूने व्यक्त केले. एफसी गोवा संघाची करंडकासाठी भूक कायम असल्याचे त्याने नमूद केले.

‘‘यंदाची आयएसएल स्पर्धा खूपच आव्हानात्मक आहे. साऱ्या संघांनी भक्कम संघबांधणीवर भर दिल्यामुळे जास्त चुरस असेल. प्रत्येक संघाने चांगल्या खेळाडूंवर भर दिला आहे, त्यामुळे प्रत्येक सामना खडतर असेल.’’

- हुआन फेरांडो,

प्रशिक्षक एफसी गोवा

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com