वेळसावची कळंगुट असोसिएशनवर मात..!

कळंगुट असोसिएशनला 4-2 फरकाने हरविले
वेळसावची कळंगुट असोसिएशनवर मात..!
Goa Sports : Football competitionsDainik Gomantak

पणजी : रोहन रॉड्रिग्जच्या चार गोलच्या बळावर वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने गोवा फुटबॉल असोसिएशनच्या 20 वर्षांखालील तासा गोवा फुटबॉल लीग स्पर्धेत (Goa Sports) बुधवारी पूर्ण तीन गुणांची कमाई केली. त्यांनी कळंगुट असोसिएशनला 4-2 फरकाने हरविले. सामना धर्मापूर येथील मैदानावर झाला.

Goa Sports : Football competitions
Goa Police Football Cup धेंपो क्लब अंतिम फेरीत..

रोहन रॉड्रिग्जच्या गोलमुळे वेळसावने सहाव्या मिनिटास आघाडी घेतली, नंतर व्हेरॉन परेराने कळंगुटला बरोबरी साधून दिली. रोहनने 26व्या मिनिटास आणखी एक गोल करून वेळसावला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर त्याने हॅटट्रिक साधली, त्यामुळे विश्रांतीला वेळसाव संघ 3-1 फरकाने आघाडीवर राहिला.

विश्रांतीनंतर संदीप पोंबुर्फेकर याने कळंगुटची पिछाडी 2-3 अशी कमी केली. 75व्या मिनिटास रोहनने सामन्यातील वैयक्तिक चौथा गोल नोंदवून वेळसावच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com