गोव्याचे माजी कर्णधार शदाब जकाती यांनी नवी स्वीकारली जबाबदारी..

नवी जबाबदारी : २५ वर्षांखालील संघाचे गोलंदाजी मार्गदर्शक
गोव्याचे माजी कर्णधार शदाब जकाती यांनी नवी स्वीकारली जबाबदारी..
Goa Sports : चंडीगड : उत्तर प्रदेशच्या २५ वर्षांखालील संघातील गोलंदाजांना मार्गदर्शन करताना शदाब जकातीDainik Gomantak

पणजी: (Goa Sports) गोव्यातर्फे रणजी क्रिकेटमध्ये (cricket) सर्वाधिक गडी बाद करणारे डावखुरे फिरकीपटू, माजी कर्णधार शदाब जकाती यांनी निवृत्तीनंतर नवी जबाबदारी स्वीकारली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने त्यांची 25 वर्षांखालील संघाचे गोलंदाजी मार्गदर्शकपदी नियुक्ती केली आहे.

Goa Sports : चंडीगड : उत्तर प्रदेशच्या २५ वर्षांखालील संघातील गोलंदाजांना मार्गदर्शन करताना शदाब जकाती
धोनी-विराटसोबत खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने वर्णद्वेषाविरोधात उठवला आवाज!

जकाती यांनी डिसेंबर 2019 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. सध्या ते 40 वर्षांचे आहेत. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने आता गोव्याच्या माजी अष्टपैलूकडे 25 वर्षांखालील संघाचे गोलंदाजी मार्गदर्शक या जबाबदारी दिली आहे. 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 20 नोव्हेंबरपासून खेळली जाईल, त्यानंतर जानेवारीच्या मध्यापासून या वयोगटातील कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धा होईल. या दोन्ही स्पर्धेत जकाती मार्गदर्शक असतील. उत्तर प्रदेशचे माजी रणजीपटू महम्मद ओबेद कमाल संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

उत्तर प्रदेशचा संघ सध्या मोहाली-चंडीगड येथे विलगीकरणात आहे, तेथेच त्यांची एकदिवसीय स्पर्धा होईल. ``निवृत्तीनंतर प्रशिक्षक या नात्याने मागील दोन वर्षांत मी अनुभव प्राप्त केला. आता उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने विश्वास दाखविला आहे. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,`` असे मत जकाती यांनी व्यक्त केले.

Goa Sports : चंडीगड : उत्तर प्रदेशच्या २५ वर्षांखालील संघातील गोलंदाजांना मार्गदर्शन करताना शदाब जकाती
ICC ची मोठी घोषणा! 2 वर्ल्डकपसह भारताकडे चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जतर्फे खेळताना जकाती यांनी यश प्राप्त केले होते. 2008 - 2014 या कालावधीत त्यांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचे प्रमुख फिरकी गोलंदाज होते, नंतर 2016-2017 या कालावधीत ते रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व गुजरात लायन्सतर्फेही खेळले. गोव्यातर्फे ते 23 वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले.

``समान आवड, पण वेगळी भूमिका. उत्तर प्रदेश 25 वर्षांखालील संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक या नात्याने आणखी एक प्रवास सुरू करतोय.``

- शदाब जकाती

दृष्टिक्षेपात शदाब जकाती यांची कारकीर्द

- गोव्यातर्फे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत 90 सामन्यांत 271 विकेट

- दुलीप करंडक स्पर्धेत दक्षिण विभागातर्फे 2 सामन्यात 4 विकेट

- प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1 शतक व 14 अर्धशतकांसह 2734 धावा

- लिस्ट ए स्पर्धेत 82 सामन्यांत 93 विकेट, 1104 धावा

- टी-20 स्पर्धेत 91 सामन्यांत 73 विकेट

- 59 आयपीएल सामन्यात 47 विकेट

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com