Goa Police Football Cup धेंपो क्लब अंतिम फेरीत..

एफसी गोवावर उपांत्य लढतीत पेनल्टी शूटआऊटवर मात..
Goa Police Football Cup धेंपो क्लब अंतिम फेरीत..
Goa Sports : Goa Police Football Cup धेंपो क्लब अंतिम फेरीत..Dainik Gomantak

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लबने (Goa Sports) पेनल्टी शूटआऊटवर एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाला 5-3 फरकाने हरवून 17व्या गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेच्या (Goa Police Football Cup) अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामना बुधवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

Goa Sports : Goa Police Football Cup धेंपो क्लब अंतिम फेरीत..
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोव्याचा 'विजय'

निर्धारित नव्वद मिनिटांच्या खेळात दोन्ही संघ 1-1 गोलबरोबरीत होते. 45+2व्या मिनिटास एचपी लालरेमरुआता याने एफसी गोवास आघाडी मिळवून दिली. नंतर 60 व्या मिनिटास पेद्रू गोन्साल्विसने केलेल्या गोलमुळे धेंपो क्लबला बरोबरी साधता आली.

पेनल्टी शूटआऊटवर धेंपो क्लबचा गोलरक्षक वेलिस्टर मेंडिस याची दक्षता निर्णायक ठरली. त्याने एफसी गोवाच्या रायन मिनेझिस याने मारलेला चौथा फटका अडवून धेंपो क्लबची स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. धेंपो क्लबच्या पाचही खेळाडूंनी आपले फटके व्यवस्थित मारले. एफसी गोवाचा आयव्हन कॉस्ता सामन्याचा मानकरी ठरला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com