टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोव्याचा 'विजय'

पुरुष गटात हरियानावर, तर महिला गटात तमिळनाडूवर मात केली.
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोव्याचा 'विजय'
Goa Sports : Goa's victory in tennis ball cricketDainik Gomantak

पणजी: राजस्थानमधील दौसा येथे सुरू असलेल्या 28 व्या फेडरेशन कप टेनिस बॉल क्रिकेट (Tennis Ball) स्पर्धेत गोव्याच्या (Goa Sports) दोन्ही संघाने विजयी सलामी दिली. पुरुष गटात हरियानावर, तर महिला गटात तमिळनाडूवर मात केली.

Goa Sports : Goa's victory in tennis ball cricket
IND vs NZ: रोहित शर्माने स्वतःच्या रिकॉर्डला मागे टाकत KL राहुल सोबत नवे स्थान मिळवले

पुरुष गटातील लढतीत हरियानाने 8 षटकांत 41 धावा केल्या. गोव्याच्या प्रसाद सतरकर व आकाश भंडारी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. नंतर शौनक पैंगीणकर (26) व अर्णव फळदेसाई (नाबाद 12) यांच्या फलंदाजीच्या बळावर गोव्याने 6.1 षटकांत 5 बाद 43 धावा करून सामना जिंकला.

महिलांच्या सामन्यात गोव्याने 6 षटकांत 4 बाद 86 धावा केल्या. तनुजा गावकरने 24, संतोषी तुयेकरने 20, मनीषा फडतेने नाबाद 15, तर आरती कुडतरकरने नाबाद 10 धावा केल्या. तमिळनाडूस निर्धारित 6 षटकांत 1 बाद 38 धावाच करता आल्या. गोव्याच्या रतिका नाईक हिने एक विकेट मिळविली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com