बांदोडकर करंडक टी-20 स्पर्धेत या दोन संघाची उपांत्य फेरीत धडक

शानदार अर्धशतकांच्या बळावर वाळपई क्लबने सुपर स्पोर्टस क्लबला 9 विकेटने सहजपणे हरविले.
बांदोडकर करंडक टी-20 स्पर्धेत या दोन संघाची उपांत्य फेरीत धडक
Goa Sports सिद्धार्थ झर्मेकरDainik Gomantak

पणजी: पणजी (Panjim) जिमखान्याच्या बांदोडकर करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी वाळपईचा युनियन स्पोर्टस क्लब (Goa Sports) व यंग स्टार्स मौळा संघाने पुढील फेरीत प्रवेश केला. सामने कांपाल येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर झाले.सिद्धार्थ झर्मेकर (नाबाद 70) व सौरभ च्यारी (54) यांच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर वाळपई क्लबने सुपर स्पोर्टस क्लबला 9 विकेटने सहजपणे हरविले.

Goa Sports सिद्धार्थ झर्मेकर
भारतीयांना संधी देणारी आयएसएल आजपासून; देशी खेळाडूंच्या संख्येत वाढ

सुपर क्लबने 7 बाद 155 धावा केल्यानंतर युनियन क्लबने 16.3 षटकांत एक विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठले. दुसऱ्या लढतीत यंग स्टार्स मौळा संघाने हडफडेच्या गोवा स्पोर्टस अकादमीस 60 धावांनी नमविले. मौळा संघाच्या युवराज पालकर (59) याने अर्धशतक नोंदविले.

संक्षिप्त धावफलक

सुपर स्पोर्टस क्लब ः 20 षटकांत 7 बाद 155 (नरेंद्र साळे नाबाद 68, नझरूल 27, शार्दुल शेट 17, निखिल च्यारी 13, प्रणाल सावंत 2-34, महेंद्र कोपार्डेकर 2-17, दामोदर पोकळे 2-39, रोहित गावकर 1-14) पराभूत वि. युनियन स्पोर्टस क्लब वाळपई: 16.3 षटकांत 1 बाद 156 (सौरभ च्यारी 54, सिद्धार्थ झर्मेकर नाबाद 70, पांडुरंग गावकर नाबाद 27, नझरूल 1-38).

यंग स्टार्स मौळा: 20 षटकांत 6 बाद 172 (युवराज पालकर 59, राजेश तुकाडिया 45, गौतम नांद्रेकर 16, हितेश तलवार 16, सैफ अली 14, रोहित पारपती 3-28, यतीन गावकर 1-30, किशोर खेडेकर 1-29) वि. वि. गोवा स्पोर्टस अकादमी ः 17.1 षटकांत सर्वबाद 112 (ओमकार नाईक 40, रोहित धारेश्वर 29, परेश नाईक 23, सैफ अली 3-27, संजय नाईक 1-21, हितेश तलवार 1-26, अजिंक्य च्यारी 1-0).

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com