जमशेदपूरची ईस्ट बंगालशी गोलबरोबरी..!

कर्णधार पीटर हार्टलीचे हेडिंग भेदक ठरल्याने जमशेदपूरला बरोबरी साधता आली.
जमशेदपूरची ईस्ट बंगालशी गोलबरोबरी..!
Goa Sports : आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील पहिला वैयक्तिक गोल नोंदविल्यानंतर अत्यानंदित झालेला ईस्ट बंगालचा फ्रान्यो प्रसे.Dainik Gomantak

पणजी: जमशेदपूर एफसीने एका गोलच्या पिछाडीनंतर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत (Goa Sports) रविवारी ईस्ट बंगालला 1-1 गोलबरोबरीत रोखले. सामना वास्को येथील टिळक मैदान स्टेडियमवर झाला.

स्पॅनिश प्रशिक्षक मानोलो डायझ यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला सामना खेळणाऱ्या ईस्ट बंगालने 17व्या मिनिटास आघाडी घेतली. क्रोएशियन बचावपटू फ्रान्यो प्रसे याने गोल केला. त्यानंतर 45+3व्या मिनिटास कर्णधार पीटर हार्टलीचे हेडिंग भेदक ठरल्याने जमशेदपूरला बरोबरी साधता आली.

Goa Sports : आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील पहिला वैयक्तिक गोल नोंदविल्यानंतर अत्यानंदित झालेला ईस्ट बंगालचा फ्रान्यो प्रसे.
क्रीडा मैदानाच्या जागेत 'एमआरएफ' शेडला विरोध..

90+2व्या मिनिटास ईस्ट बंगालच्या जॅकिचंद सिंगच्या दूरवरील फटक्याचा नेम चुकल्यामुळे गोलबरोबरीची कोंडी कायम राहिली, तसेच यंदा आयएसएल स्पर्धेतील पहिल्या बरोबरीची नोंद झाली. ईस्ट बंगाल, तसेच जमशेदपूर एफसीला प्रत्येकी एक गुण मिळाला.

पूर्वार्धातील 45 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांनी प्रत्येक एक गोल नोंदविला. दोन्ही वेळेस गोल सेटपिसेसवर संघातील सेंट्रल डिफेंडर खेळाडूने नोंदविले. क्रोएशियन बचावपटू फ्रान्यो प्रसे याने ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. बिकाश जैरूच्या शानदार कॉर्नर फटक्यावर जमशेदपूरचा गोलरक्षक टीपी रेहेनेश याने चेंडूची दिशा बदलली. यावेळी चेंडू अंतोनियो पेरोसेविच याच्याकडे गेला असता त्याने चेंडूला गोलक्षेत्रात मारले, यावेळी प्रसे याने चपळाई दाखवत अप्रतिम ओव्हरहेड किकवर कोलकात्याच्या संघाचे गोलखाते उघडले. पूर्वार्धातील भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटास जमशेदपूरच्या पीटर हार्टली याचे हेडिंग अचूक ठरले.

Goa Sports : आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील पहिला वैयक्तिक गोल नोंदविल्यानंतर अत्यानंदित झालेला ईस्ट बंगालचा फ्रान्यो प्रसे.
अखेर GUJ ने आंदोलन मागे घेतले..!

अलेक्झांडर लिमा याचा कॉर्नर फटका नेरियूस व्हाल्स्किस याने नियंत्रित केला, नंतर चेंडू पीटर हार्टलीच्या दिशेने गेला. यावेळी जमशेदपूर कर्णधाराचे हेडिंग गोलरक्षक अरिंदम भट्टाचार्या याला अडविता आले नाही.

दृष्टिक्षेपात...

- आयएसएलमध्ये पहिला सामना खेळणाऱ्या ईस्ट बंगालचा 25 वर्षीय क्रोएशियन बचावपटू फ्रान्यो प्रसे याचा गोल

- जमशेदपूरच्या पीटर हार्टलीचे 20 सामन्यांत 3 गोल, यंदा दुसरा आयएसएल मोसम

- ईस्ट बंगाल व जमशेदपूर यांच्यातील 3 लढतीत आता 2 बरोबरी, ईस्ट बंगाल 1 लढतीत विजयी

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com